Join us

Breaking : उद्धव ठाकरेच 5 वर्षांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेनं केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 15:27 IST

Maharashtra Government News: शिवसेना खासदार आणि महाविकास आघाडीला एकत्र बांधण्यात ज्यांनी मोलाची भूमिका बजावली

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नाट्यानंतर पुन्हा एकदा सर्वात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तीन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश होते. तत्पूर्वीच अजित पवारांनी राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आले आहे. 

शिवसेना खासदार आणि महाविकास आघाडीला एकत्र बांधण्यात ज्यांनी मोलाची भूमिका बजावली ते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव घोषित केले आहे. उद्धव ठाकरे हे पुढील 5 वर्षांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, असे राऊत यांनी माध्यमांना सांगितले. त्यामुळे, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, हे स्पष्ट होत आहे. उद्धव ठाकरेंच्या रुपाने ठाकरे कुटुंबातील पहिलाच व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. आपल्या वडिलांचे म्हणजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काहीही करेल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. त्यानुसार, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनासंजय राऊतमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस