Join us

Maharashtra Government: विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोलेंची बिनविरोध निवड; कथोरेंनी अर्ज मागे घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 11:19 IST

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक बिनविरोध व्हावी असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता.

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षामध्ये ठाकरे सरकारने बहुमत चाचणीत यशस्वी लढाई केल्यानंतर रविवारी होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार होती. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले तर भाजपाकडून किसन कथोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र भाजपाने किसन कथोरे यांची उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. 

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक बिनविरोध व्हावी असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. सत्ताधारी आणि विरोधकांची एकत्रित बैठक झाली. अध्यक्षांचे पद वादात आणायचं नाही, अध्यक्ष हा कोणत्याही पक्षाचा नसतो, सभागृह चालविण्याची भूमिका त्यांची असते. त्यामुळे किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येत आहे. अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

 

विधानसभा अध्यक्ष हा एका पक्षाचा नसतो, महाराष्ट्राची परंपरा आहे विधानसभा अध्यक्ष बिनविरोध होतो. यंदाही ही परंपरा कायम राहील असा विश्वास वाटतो. सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून एकत्र बैठक घेऊन जर सकारात्मक झालं तर अध्यक्षपद बिनविरोध होईल असं नाना पटोलेंनी सांगितले होतं.  

 

शनिवारी राज्यातील सत्तासंघर्ष नाट्याचा अंतिम निर्णय पार पडला. उद्धव ठाकरे सरकारने बहुमत चाचणीत १६९ विरुद्ध ० असा ठराव समंत केला. बहुमत चाचणीवेळी भाजपा आमदारांनी सभात्याग केला. नियमाला धरुन हे अधिवेशन बोलाविले नाही असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजपा आमदारांनी यावेळी सभागृहात गोंधळ घातला होता. 

नाना फाल्गुनराव पटोले

शिक्षण - पदवीधर 

१९९२ - भंडारा जिल्हा परिषदेचे सदस्य

१९९४ - भंडारा जिल्हा बँकेचे संचालक

१९९९ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य

२००४ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य

२००९ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य

२०१४ लोकसभा सदस्य 

२०१९  महाराष्ट्र विधानसभा सदस्य 

डिसेंबर २०१७ पासून भारतीय राष्ट्रीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यरत 

टॅग्स :नाना पटोलेविधानसभाभाजपाकाँग्रेस