Join us  

Maharashtra Government : 'याद मुझे दर्द पुराने नही आतें', संजय राऊतांनी 'शायरी'तून भाजपाला डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 11:03 AM

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची चर्चा सुरु आहे.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून एकसुत्री कार्यक्रम ठरविण्याचं काम सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची बॅटींग अद्यापही सुरूच आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन भाजपाला टार्गेट केलं आहे. तसेच, मला जे काही बोलायंच होतं ते मी अग्रलेखातून बोललोय. त्यामुळे आज पत्रकार परिषद घेत नसल्याचं राऊत यांनी सांगितलं.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची चर्चा सुरु आहे. राज्याच्या हितासाठी किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी वेळ लागतो. पण, पुढील २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा हीच आमची इच्छा आहे. मात्र, आम्ही मी पुन्हा येईन वारंवार सांगणार नाही, आम्हाला महाराष्ट्रात राहायचं आहे. राज्यातच राजकारण करायचं आहे अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता. त्यानंतर, आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर शब्दांचे तीक्ष्ण बाण सोडले आहेत. तसेच, राऊत यांनी एक ट्विट करुनही पुन्हा भाजपाला डिवचले आहे. 

यारो नये मौसम ने ये एहसान किया हैयाद मुझे दर्द पुराने नही आते...

हा शेर ट्विट करुन संजय राऊत यांनी भाजपला टार्गेट केलंय. 

दरम्यान, दुष्काळ, ओला दुष्काळ यावर जास्त करावं लागणार आहे. आमच्यासोबत जे लोक जोडले आहेत त्यांचा राज्य चालविण्याचा अनुभव जास्त आहे. 24 तारखेनंतर मी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेहमी सांगतोय, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार येणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सोमवारी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र रुग्णालयात दाखल असतानाही राऊत बेडवर बसून दैनंदिन काम करीत असल्याचं पाहायला मिळालं.

टॅग्स :संजय राऊतराष्ट्रवादी काँग्रेसट्विटरभाजपाशिवसेना