“कोश्यारी यांच्या वक्तव्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, त्यांचे वक्तव्य राजकीयदृष्ट्या प्रेरित”

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 04:18 PM2023-02-21T16:18:08+5:302023-02-21T16:18:36+5:30

राष्ट्रवादीचा माजी राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल

maharashtra former governor bhagat singh Koshiyari s statement should not be taken too seriously his statement is politically motivated ajit pawar ncp criticizes | “कोश्यारी यांच्या वक्तव्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, त्यांचे वक्तव्य राजकीयदृष्ट्या प्रेरित”

“कोश्यारी यांच्या वक्तव्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, त्यांचे वक्तव्य राजकीयदृष्ट्या प्रेरित”

googlenewsNext

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार झाल्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. त्यांचे वक्तव्य राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे असे,” मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले.

“वास्तविक राज्यपाल पदाची जबाबदारी स्वीकारल्यावर भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करणे, राज्य शासनास वेळोवेळी मार्गदर्शन करणे अशा अनेक गोष्टी भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून अपेक्षित होत्या. परंतु सरकार स्थापनेचे निमंत्रण न देताच एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला, याचा खुलासा माहिती अधिकारातून झालेला आहे,” असेही महेश तपासे म्हणाले. 

अनेक वक्तव्यांवर स्वतःचे मत मांडणाऱ्या भगतसिंग कोश्यारी यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले नसल्याचे आता आरटीआयच्या माहितीतून समोर आले आहे यावरही आपले मत भगतसिंग कोश्यारी यांनी मांडायला हवे असा टोलाही त्यांनी लगावला. “महाविकास आघाडी सरकार पायउतार होताच शिंदे -फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी दिलेले पत्र अखेर कुठे आहे? याचे उत्तर भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे,” अशी मागणीही तपासे यांनी केली.

Web Title: maharashtra former governor bhagat singh Koshiyari s statement should not be taken too seriously his statement is politically motivated ajit pawar ncp criticizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.