Maharashtra Government:हा तर ‘फर्जिकल स्ट्राइक’; उद्धव ठाकरे यांची टीका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 04:49 IST2019-11-24T04:48:56+5:302019-11-24T04:49:23+5:30

सध्या राज्यात लोकशाहीचा जो खेळ चालू आहे तो देशासाठी लाजिरवाणा आहे.

Maharashtra Election, Maharashtra Government : This is a 'physical strike'; Uddhav Thackeray criticizes | Maharashtra Government:हा तर ‘फर्जिकल स्ट्राइक’; उद्धव ठाकरे यांची टीका  

Maharashtra Government:हा तर ‘फर्जिकल स्ट्राइक’; उद्धव ठाकरे यांची टीका  

मुंबई : सध्या राज्यात लोकशाहीचा जो खेळ चालू आहे तो देशासाठी लाजिरवाणा आहे. आमची लढाई 'मी' पणा विरुद्ध आहे, काही लोक मी पुन्हा येईन म्हणण्यापेक्षा फेविकॉल लावून मी जाणारच नाही असे म्हणत आहेत, त्या विरुद्ध आम्ही निकराने लढा देऊ. भाजपने केलेला हा तर ‘फर्जिकल स्ट्राईक’ असून जनता त्यांना माफ करणार नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना पत्रकार परिषदेत व्यक्त केल्या.

पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, काही लोक 'रात्रीस खेळ चाले' या वृत्तीने माणसं फोडण्याचे राजकारण करत आहेत. आम्ही समोरासमोर बोलणी करून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत असताना भाजपचे नेते पाठीवर वार करत आहेत. आम्ही मर्द मराठे आहोत. मर्द मावळे रणांगणावर लढतात, पाठीवर वार करत नाहीत. राज्यातली जनता याचा सूड घेतल्याशिवाय थांबणार नाही. तुमच्या पक्षातील आमदार फुटू शकतील म्हणून तुम्ही त्यांना सुरक्षित ठेवले आहे का? असे विचारले असता ठाकरे म्हणाले, कोणत्याही आमदाराला हिम्मत असेल तर फोडून दाखवा, महाराष्ट्र पेटून उठेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government : This is a 'physical strike'; Uddhav Thackeray criticizes