Maharashtra Election, Maharashtra CM: The state will go further, stability will surely come - Amrita Fadnavis believes | Maharashtra CM: राज्य अधिक प्रगतिपथावर जाईल, स्थैर्य नक्कीच मिळेल, अमृता फडणवीस यांचा विश्वास
Maharashtra CM: राज्य अधिक प्रगतिपथावर जाईल, स्थैर्य नक्कीच मिळेल, अमृता फडणवीस यांचा विश्वास

मुंबई : आजचा दिवस अभूतपूर्व आहे, राज्यातील जनतेच्या मनात होते ते घडताना आनंद होत आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे राज्याला स्थिर सरकार नक्कीच देतील आणि राज्य अधिक प्रगतीपथावर नेतील, असा विश्वास फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी व्यक्त केला.

लोकमतशी बोलताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र देशातील क्रमांक एकचेच राज्य राहील यासाठी देवेंद्र यांच्या नेतृत्वात काम व्हावे अशी लोकेच्छा आहे आणि तेच माझ्याही मनात आहे. गेली पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी ज्या पद्धतीने झोकून देत काम केले ते सर्वांनीच बघितले आहे. ‘पर्सन टू पर्सन आणि हार्ट टू हार्ट’ अशी त्यांची कामाची पद्धत आहे. जनतेच्या इच्छाआकांक्षांच्या पूर्तीसाठी ते नक्कीच काम करतील.

देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता यांना आनंदाश्रू आवरले नाहीत. त्या म्हणाल्या की, माझ्या मुलाने मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची अविरत सेवा केली. लाखो लोकांच्या कल्याणासाठी काम केले, पक्ष कार्यासाठी झोकून दिले. ही सगळी मेहनत वाया जाणार नाही, अशी खात्री होतीच. आज तो दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होताना माझ्या भावना अनावर आहेत.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra CM: The state will go further, stability will surely come - Amrita Fadnavis believes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.