मुंबई : जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, तर अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारच्या हाती राज्याची सूत्रे जातील. शिवाय, भाजपने फोडाफोडी केली, तर पक्षाचेच नुकसान होईल. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी व्हावे, यासाठी काँग्रेसचे तरुण आमदार आग्रही असल्याचे समजते.महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमुळे काँग्रेसने आपले आमदार जयपूरला हलविले आहेत. शहराबाहेर असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सध्या त्यांचा मुक्काम आहे. राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस अविनाश पांडे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांनी आमदारांची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतली. युती तुटली का? शिवसेना केंद्र सरकार आणि एनडीएतून बाहेर पडली का, असे खरगे यांनी विचारले असता, त्यावर अनेक आमदार निरुत्तर झाल्याचे समजते.>काँग्रेस आमदारांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. पक्षश्रेष्ठींना भेटणार आहोत. त्यानंतरच शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, हा निर्णय होईल.- अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तेत जाण्यास काँग्रेसचे तरुण आमदार आग्रही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 06:21 IST