Maharashtra Election 2019: भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांच्या समजूतीसाठी विविध ‘फंडे’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 19:38 IST2019-10-10T19:37:58+5:302019-10-10T19:38:13+5:30
सत्ताधारी भारतीय जना पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांच्या राडेबाजीमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या घाटकोपर (पू) विधानसभा मतदारसंघात त्यांना प्रचारात सक्रीय करण्यासाठी ‘साम,दाम दंड,भेद’ या तत्वाचा वापर सुरु करण्यात आला आहे.

Maharashtra Election 2019: भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांच्या समजूतीसाठी विविध ‘फंडे’
मुंबई : सत्ताधारी भारतीय जना पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांच्या राडेबाजीमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या घाटकोपर (पू) विधानसभा मतदारसंघात त्यांना प्रचारात सक्रीय करण्यासाठी ‘साम,दाम दंड,भेद’ या तत्वाचा वापर सुरु करण्यात आला आहे.
भाजपाचे उमेदवार पराग शाह व त्यांच्या समार्थकाकडून विभागवार कार्यकर्त्याच्या भेटीगााठी सुरु केल्या आहेत. त्याची समजूत काढण्यासाठी त्यांच्याावर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्ती, माध्यम व साधनांचा वापर केला जात आहे.
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघामध्ये गेल्या सहा निवडणूका बहुमताने जिंकणार्या प्रकाश महेता यांना डावलून पक्षश्रेष्ठींनी शाह यांना तिकीट दिले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत शाह यांच्या मोटारीची मोडतोड केली होती. तेव्हापासून नाराज कार्यकर्त्यांच्या समजूत काढून त्यांना प्रचारात सहभागी करुन घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.