Maharashtra Election 2019: Salman Khan's Bodyguard Shera Joins Shiv Sena | Maharashtra Election 2019: शिवसेनेला मिळाला बॉलिवूडचा 'बॉडीगार्ड'; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन
Maharashtra Election 2019: शिवसेनेला मिळाला बॉलिवूडचा 'बॉडीगार्ड'; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रचाराला रंगत आली आहे. प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. शुक्रवारी बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या बॉडीगार्डने शिवसेनेत प्रवेश केला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरमीत सिंग उर्फ शेरा जी यांनी  मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश करत हाती शिवबंधन बांधले. 

सध्या राजकारणात पक्षांतराचा खेळ सुरु आहे. अशातच सिनेमा क्षेत्रातील निगडीत व्यक्तीही राजकारणात प्रवेश करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच मराठी सिनेमातील अभिनेत्री दीपाली सय्यद हिनेही शिवसेनेत प्रवेश केला होता. दीपाली सय्यदलाशिवसेना-भाजपाकडून मुंब्रा कळवा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. 

शेरा हा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा विश्वासू बॉडीगार्ड आहे. गेल्या २० वर्षापासून सलमान खानसोबत शेरा सावलीसारखा असतो. खान कुटुंबीयांमध्येही शेराला मान दिला जातो. २१ ऑक्टोबरला राज्यात मतदान होणार आहे. २८८ मतदारसंघात शिवसेना-भाजपा युतीमध्ये निवडणूक लढवित आहे. 

Web Title: Maharashtra Election 2019: Salman Khan's Bodyguard Shera Joins Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.