मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल आहे.
वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंसमोर राष्ट्रवादी काँग्रेसने सुरेश माने यांना मैदानात उतरविले आहे. त्यातच बिग बॅास फेम व साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बिचुकलेवरळीतून आदित्य ठाकरेंना आव्हान देणार आहेत. तसेच राज ठाकरे पुतण्या विरोधात उमेदवार न दिल्याने आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघातून विजय जवळपास निश्चित मानण्यात येत आहे. मात्र यावर सामाजिक कार्यकत्या अंजली दमानिया यांनी आदित्य ठाकरेंना टोला ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.