Join us  

...अन् विधानसभा अध्यक्षांनी धुडकावली सत्ताधाऱ्यांची सूचना; 'तो' ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 1:38 PM

सत्तापक्षाच्या सूचनेला फाटा देत अध्यक्षांनी स्वतः हून ठराव मांडला आणि त्यात सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.

मुंबई - देशाच्या जनगणनेत ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी शिफारस केंद्र सरकारला करणारा ठराव विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला आणि तो एकमताने मंजूरही करून घेतला विशेष म्हणजे हा ठराव आजच न घेता आधी कामकाजामध्ये ठरवून पुढील अधिवेशनात घ्यावा अशी सूचना केली होती पण ती पाठवली आणि धुडकावली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामकाजाच्या पद्धतीचा रूढी व परंपरा यांचा दाखला देत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सभागृहाचे कामकाज व्हावे असे मत व्यक्त केले. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा ठराव मांडण्याचे ठरलेले नव्हते त्यामुळे आज हा ठराव मांडू नये विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तो मांडावा अशी सूचना अजित पवार यांनी केली.

संसदीय कामकाज मंत्री शिवसेनेचे अनिल परब यांनी अजित पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. तरीही अध्यक्ष पटोले हे याच अधिवेशनात ठराव म्हणण्यावर ठाम राहिले. पटोले यांच्या भूमिकेला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार पाठिंबा दिला यानिमित्ताने सत्तारूढ पक्षातील सत्तारूढ महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले. तसेच सत्तापक्षाच्या सूचनेला फाटा देत अध्यक्षांनी स्वतः हून ठराव मांडला आणि त्यात सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

ZP Election 2020: धुळ्यात भाजपाची सत्तेकडे वाटचाल, १९ जागांवर विजय

युक्रेनचं विमान इराणमध्ये कोसळलं; 180 जणांचा मृत्यू

धक्कादायक... ऑस्ट्रेलिया सरकार १० हजार उंटांना गोळ्या झाडून ठार करणार!

JNU Attack: नऊ वर्षांपूर्वी राहुल गांधींबद्दल काय म्हणाली होती दीपिका?; व्हिडीओ व्हायरल

 

टॅग्स :महाराष्ट्रनाना पटोलेभाजपाशिवसेना