मनिषा म्हात्रे
Bhandup Assembly Constituency : भांडुपमध्ये उद्धव सेनेचे उमेदवार रमेश कोरगावकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची भांडुपच्या गाढव नाका परिसरात प्रचार सभा रंगणार होती. त्यानुसार, ठाकरे गटाचे कार्यकर्तेही जमले होते. मात्र रात्री सव्वा नऊच्या सुमारास अखेर उशीर होत असल्याने उद्धव ठाकरे यांना या सभेसाठी पोहोचता आले नाही. डोंबिवलीत वाहतूक कोंडीत अडकल्याने उद्धव ठाकरे यांनी फोन ऑडिओद्वारे नागरिकांची माफी मागत संवाद साधला.
भांडूपमध्ये रमेश कोरगावकार यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उद्धव ठाकरे हे देखील हजेरी लावून मार्गदर्शन करणार होते. भांडुपच्या प्रचार सभेला उद्धव ठाकरे पोहचू शकले नाहीत. त्यामुळे अन्य कार्यकर्त्यांनीच सभा आटोपती घेतली. त्यानंतर ऑडिओ मेसेजद्वारे उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. वाहतूक कोंडीत अडकल्याने उद्धव ठाकरे यांनी ऑडियोद्वारे नागरिकांसोबत संवाद साधला.
"मी आपली हात जोडून माफी मागतो कारण वेळेचं गणित जुळत नाहीये. आता मी डोंबिवलीतून गचके खात खात रस्त्याने ठाण्याला निघालो आहे. ठाणे म्हणजे तुम्हाला माहिती आहे गद्दाराचे केंद्र. अर्थातच माझा तुमच्यावर आणि तुमचा माझ्यावर आहे. रमेशला ही खोके दाखवले असतील पण ते निष्ठेला जगाले. हे जे सरकार आहे महायुतीचे आहे. ते सगळे उद्योग धंदे गुजरातला नेत आहे. आमच्या हक्काचे नेत आहे. त्यामुळं महाराष्ट्रचं पाणी काय आहे हे दाखवल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा मोदी आणि शहा यांच्या हुकूमशहीला टक्कर कोण देणार? तेव्हा आपण त्यांना दाखवून दिले होते. आता नुसते नाही पाडायचे संपूर्ण भुईसपाट करून दाखवायचे आहे. आता माती खायला लावायचा. १० वाजता प्रचार संपेणार आहे. पण मी तुम्हाला बीकेसी येथील सभेचे आपल्याला निमंत्रण देतो. कृपा करून रागवू नका. नाराज होवू नका. मी आपलाच आहे. आपण एकत्र येवून महाराष्ट्र द्रोहीना गाडूयात," असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.