Mahaparinirvan Din 2025: महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर रेल्वे स्टेशनवर मर्यादित प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:07 IST2025-12-04T16:07:28+5:302025-12-04T16:07:40+5:30
Mahaparinirvan Din 2025 Dadar: गुरुवार, ५ डिसेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी रात्री १२ या कालावधीत दादर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना मर्यादित प्रवेश देण्यात येणार आहे.

Mahaparinirvan Din 2025: महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर रेल्वे स्टेशनवर मर्यादित प्रवेश
मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार, ५ डिसेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी रात्री १२ या कालावधीत दादर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना मर्यादित प्रवेश देण्यात येणार आहे. अनुयायांचे मार्गदर्शन कारण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे ४०० लोहमार्ग पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे दादर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले.
-दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकातील पूर्व-पश्चिम जोडणारा मध्य मोठा ब्रिज व फलाट क्र. १२ वरील सर्व प्रवेशद्वार शहर हद्दीतून रेल्वे स्थानकात येणाऱ्यांकरिता बंद राहील. केवळ एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी हा पूल खुला राहील.
- स्कायवॉक ब्रिज स्थानकाबाहेरील पूर्व-पश्चिम शहर हद्दीतून येणाऱ्या अनुयायी व दैनंदिन रेल्वे प्रवाशांसाठी दादर रेल्वे स्थानकांवरील फलाटावर येण्याकरिता खुला राहील.
- दादर पश्चिम रेल्वे स्थानक फलाट क्र. १ वरील स्कायवॉक ब्रिजलगतचे गेट क्र.१, ६ व ७ वगळता सर्व प्रवेशद्वार हे रेल्वे प्रवासी व अनुयायांना शहर हद्दीतून फलाटावर येण्यास बंद राहतील.
- दादर पश्चिम रेल्वेस्थानक फलाट क्र. १ वरील लंगडा/आंधळा पादचारी पूल शहर हद्दीतून येणाऱ्या रेल्वे प्रवासी व अनुयायांना पश्चिमेकडून पूर्वकडे जाण्यास बंद राहील.
--------------
मध्य रेल्वेकडून शुक्रवारी आणि शनिवारी मध्यरात्री १२ विशेष लोकल अशा असतील
- कुर्ला –परळ १२:४५
- कल्याण– परळ १ वाजता
- ठाणे–परळ २:०१ वाजता
- परळ– ठाणे/कल्याण १:१५ वाजता
- परळ – कल्याण २:३० वाजता
- परळ– कुर्ला ३:०५ वाजता
- वाशी – कुर्ला १:३० वाजता
- पनवेल – कुर्ला १:४० वाजता
- वाशी–कुर्ला ३:१० वाजता
- कुर्ला – वाशी २:३० वाजता
- कुर्ला – पनवेल ३ वाजता
- कुर्ला –वाशी ४ वाजता