जागा वाटपाबाबत ७ ऑगस्टला मविआची बैठक; बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 06:21 IST2024-08-01T06:20:27+5:302024-08-01T06:21:26+5:30

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

maha vikas aghadi meeting on august 7 regarding seat allocation balasaheb thorat met uddhav thackeray | जागा वाटपाबाबत ७ ऑगस्टला मविआची बैठक; बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

जागा वाटपाबाबत ७ ऑगस्टला मविआची बैठक; बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांची जागा वाटपासंदर्भात  येत्या ७ ऑगस्ट रोजी पहिली बैठक होत आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जागा वाटपाच्या बैठकीबाबत आमची उद्धव ठाकरेंशी चर्चा झाल्याचे थोरात यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

 मी उद्धव ठाकरे यांना भेटलो तेव्हा तिथूनच आम्ही शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी याबाबत फोनवरून चर्चा केल्याचे थोरात यांनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये जे समन्वयक आहेत त्यांचीही बैठक मुंबईत असेल, असेही थोरात यांनी सांगितले.

 

Web Title: maha vikas aghadi meeting on august 7 regarding seat allocation balasaheb thorat met uddhav thackeray