सोनियाची मुंबई नगरी! वरळीत तब्बल १८७ कोटींना विकला गेला फ्लॅट, इतकं खास काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:18 IST2025-03-18T15:17:20+5:302025-03-18T15:18:19+5:30

Mumbai Most Expensive Apartment: दक्षिण मुंबईतील वरळी भागात एका उच्चभ्रू इमारतीत एक फ्लॅट तब्बल १८७.४७ कोटी रुपयांना विकला गेला आहे. 

Luxury apartment at Lodha Sea View in Mumbai's Worli sold for Rs 187 cr | सोनियाची मुंबई नगरी! वरळीत तब्बल १८७ कोटींना विकला गेला फ्लॅट, इतकं खास काय?

सोनियाची मुंबई नगरी! वरळीत तब्बल १८७ कोटींना विकला गेला फ्लॅट, इतकं खास काय?

Most Expensive Flat in Mumbai: मुंबईत घर घेणं काही सोपं काम नाही असं म्हणतात ना ते काही खोटं नाही. कारण या स्वप्नांच्या नगरीत रिअल इस्टेट क्षेत्रात होणारे व्यवहार पाहता याची सहज कल्पना येते. नुकतंच दक्षिण मुंबईतील वरळी भागात एका उच्चभ्रू इमारतीत एक फ्लॅट तब्बल १८७.४७ कोटी रुपयांना विकला गेला आहे. 

वरळीत निवासी घरांच्या व्यवहारातील हा सर्वात मोठा व्यवहार मानला जात आहे. मॅक्रोटेक डेव्हलपर्सच्या लोधा सी व्ह्यू प्रोजेक्टमधील १५ हजार स्वेअरफूटांच्या आलिशान फ्लॅटची विक्री १८७.४७ कोटी रुपयांना झाल्याची माहिती स्वेअर यार्ड्सने दिली आहे. 

महारेराच्या माहितीनुसार वरळीत लोधा सी फेस नावाने निवासी उच्चभ्रू वसाहतीचा प्रकल्प १.५ एकर जागेवर निर्माण करण्यात आला आहे. ज्यात ५ आणि ६ बीएचके असे एकूण २९ फ्लॅट्स आहेत. त्यातील १,३८१ स्वेअर फूटांच्या एका फ्लॅटचा व्यवहार १८७ कोटींमध्ये झाला आहे. ज्यात फ्लॅटसोबत ७ कार पार्किंग स्पेसचा देखील समावेश आहे. या व्यवहारासाठी मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) तब्बल ११.२५ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. 

समोर आलेल्या माहितीनुसार दक्षिण मुंबईत सध्या वरळी हे प्राइम लोकेशन ठरत आहे. गेल्या वर्षभरात वरळीत जवळपास ७,३२६ कोटी रुपयांचे घर खरेदीचे व्यवहार झाले आहेत. ज्यात काही आलिशान घरांच्या खरेदीचाही समावेश आहे. वांद्रे-वरळी सीलिंकची कनेक्टीव्हिटी, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, कोस्टल रोड या सुविधांमुळे वरळीचा भाव सध्या वाढला आहे. 

१८७ कोटींच्या फ्लॅटमध्ये खास काय?
- वरळीचं सी-व्ह्यू लोकेशन
- ६ बीएचके अपार्टमेंट
- १,३८१ स्वे. फूटांची एकूण जागा
- ७ कार पार्किंगच्या जागा

Web Title: Luxury apartment at Lodha Sea View in Mumbai's Worli sold for Rs 187 cr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.