५,२८५ घरांच्या लॉटरीला १२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, ९ ऑक्टोबर रोजी काढणार लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 11:18 IST2025-08-29T11:18:36+5:302025-08-29T11:18:59+5:30
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५ हजार २८५ सदनिका व ओरोस (सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीच्या लॉटरीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला १२ सप्टेंबरपर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली.

५,२८५ घरांच्या लॉटरीला १२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, ९ ऑक्टोबर रोजी काढणार लॉटरी
मुंबई - म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५ हजार २८५ सदनिका व ओरोस (सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीच्या लॉटरीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला १२ सप्टेंबरपर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. अनामत रकमेसह प्राप्त पात्र अर्जाची सोडत आता ९ ऑक्टोबरला ठाण्यायातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात काढण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
असे आहे वेळापत्रक
२८ ऑगस्टच्या दुपारी ४ वाजेपर्यंत १,४९,९४८ अर्ज प्राप्त झाले असून, अनामत रकमेसह १,१६,५८३ अर्ज प्राप्त झाले आहेत. नवीन वेळापत्रकानुसार १२ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येईल. १३ सप्टेंबरच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करता येईल.
१५ सप्टेंबरच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत आरटीजीएस / एनईएफटीद्वारे अर्जदारांना बँकेत अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. दि. २४ सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती नोंदविता येतील. पात्र अर्जदारांची अंतिम यादी दि. ७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. ९ ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे लॉटरी काढली जाईल.