Loss of agriculture due to rain; Flood conditions in many places | पावसाने शेतीचे अतोनात नुकसान; अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती

पावसाने शेतीचे अतोनात नुकसान; अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने कहर माजवला असून गेले चार दिवस पङणाऱ्या पावसाने राज्यातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. धरणातून पाणी सोडल्याने पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच हवामानखात्याने चक्रीवादळाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडण्याचे चिन्हे आहेत.

मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर वाढला होता. गेले चार दिवस पडणाºया पावसाने मराठवाड्यात खरिपातील सोयाबीनसह कापसू, बाजरी, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. लातूरच्या मांजरा प्रकल्पामध्ये पाणी आल्याने लातूरचा पाणी प्रश्न मिटला आहे. यासह मराठवाड्यातील लहानमोठे प्रकल्प भरल्याने पाणी समस्या सुटली आहे.

खडकपूर्णातून ५८ हजारांचा विसर्ग

खडकपूर्णा नदीच्या उगम क्षेत्रासह जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मंडळामध्ये गत २४ तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे तथा बुलडाणा जिल्ह्यातील मराठवाड्यालगतच्या पट्ट्यात झालेल्या दमदार पावसामुळे आधीच १०० टक्के भरलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली होती. त्यामुळे देऊळगाव मही स्थित खडकपूर्णा प्रकल्पातून ५८ हजार ३१३ क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू आहे.

अहमदनगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत आहे. उजनी धरणातून ७० हजार क्यसेक तर वीर धरणातून ५४ हजाराचा विसर्ग भीमा नदीत होत असल्याने भीमाकाठावर पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे.

दोन पूल वाहून गेले

सातारा जिल्ह्यात पाऊस झोडपत असल्यामुळे पुराच्या पाण्यामुळे माण आणि फलटणमधील दोन पूल वाहून गेले. तसेच सततच्या या पावसामुळे पिके, फळबागा, घरे, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या जिल्ह्यातील कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी अशा प्रमुख धरणातून विसर्ग सुरू आहे.पावसाने सांगली, मिरजेलाही झोडपून काढले. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा, भोगावती नद्या दुथडी भरुन वहात आहेत. कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

खानदेशालाही फटका

खानदेशातील धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक जिल्ह्यातही संततधार पावसाने उभी पिके नासली आहेत. गेली तीन वर्षे दुष्काळाचा दाह सहन करणाºया शेतकºयांचा यंदाही हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाच्या माºयाने मातीमोल झाला असून, ६० टक्के उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता शेतकºयांनी बोलून दाखवली आहे.

नेवाशात घर कोसळून चार ठार

नेवासा (जि. अहमदनगर) : मुसळधार पावसाने घर कोसळून भिंतीखाली दबल्याने चार जण जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास येथे घडली. जाफरखान पठाण (वय ६२),उसामा खान पठाण (१८), नर्गिस शहजादेखान पठाण (३०), बेबी रहतुल्ला खान पठाण (६०) अशी मयतांची नावे आहेत. रात्री झालेल्या जोरदार पावसाने पठाण वाड्यातील एका खोलीचे छत कोसळले.
च्या छताखाली दबल्याने चौघांचा मृत्यू झाला. अख्खी खोलीच खाली बसल्याने चौघांना बाहेर पडणे कठीण झाले. मातीखाली दबून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडताच नागरिकांनी पठाण वाड्याकडे धाव घेतली. मलब्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दबलेल्या पाच जणांना बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यातील चौघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Loss of agriculture due to rain; Flood conditions in many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.