Join us
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच्या जागावाटपाचा पेच आज सुटणार, दिल्लीत शिक्कामोर्तब होणार; अजित पवारांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 08:34 IST

लोकसभा निवडणुकांची काही दिवसातच घोषणा होईल, पण अजुनही महायुती मधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही.

Ajit Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची काही दिवसातच घोषणा होईल, पण अजुनही महायुती मधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. जागावाटपाबाबत गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरु आहेत. महायुतीमधील जागावाटपासाठी तिन्ही घटक पक्षांचे प्रमुख नेते आज दिल्लीत बैठकीसाठी जाणार आहेत. या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.  

जागावाटपाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, सर्वांचा सन्मान होईल, अशा पद्धतीने जागावाटप होईल. जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करणार आहे. महाविकास आघाडीचा बारामती लोकसभेचा उमेदवार जाहीर झाला, आम्ही आमचाही उमेदवार जाहीर करु, असंही अजित पवार म्हणाले. 

राज्यात सुखकर विमान प्रवासाची गॅरंटी: PM मोदी, लोहगाव, कोल्हापूर नव्या टर्मिनलचे लोकार्पण

"आम्ही महायुतीमध्ये किती जागा मागितल्या आहेत ते जाहीर करणार नाही, पण व्यवस्थित मागितल्या आहेत. तिन्ही पक्षांचा सन्मान राहिल अशा पद्धतीने जागावाटप होणार आहे. आज सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह मी दिल्लीला जाणार आहे. दिल्लीत जागावाटपावर चर्चा होणार आहे, यामुळे जागावाटपावर दोन दिवसात शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. 

उद्धव ठाकरेंनी मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभेतील उमेदवार केला जाहीर

उद्धव ठाकरेंनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील अंधेरी पूर्व व जोगेश्वरी पूर्व ,वर्सोवा व अंधेरी पश्चिम येथील चार विधानसभा क्षेत्रातील चार शिवसेना शाखांना भेटी देवून त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.आणि या चारही विधानसभा मतदार संघात त्यांनी शिवसेना उपनेते आणि युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहिर केली. उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानंतर मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी ट्विट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

टॅग्स :अजित पवारभाजपाशिवसेनानिवडणूक