Lokmat Most Stylish Awards 2018: रणवीर सिंग ठरला मोस्ट स्टायलिश सुपरस्टार
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 15:29 IST2018-12-19T20:38:35+5:302018-12-28T15:29:38+5:30
लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचं तिसरं पर्व

Lokmat Most Stylish Awards 2018: रणवीर सिंग ठरला मोस्ट स्टायलिश सुपरस्टार
मुंबई: लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड २०१८ च्या दिमाखदार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. सिनेमा, संगीत, फॅशन, राजकारण, प्रशासन, उद्योग, शिक्षण, कला अशा विविध क्षेत्रातील स्टायलिश व्यक्तीमत्त्वांचा गौरव या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकमतकडून करण्यात स येत आहे. लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचं हे तिसरं वर्ष आहे.
स्टाईल म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर फक्त चित्रपटसृष्टीतले चमचमते तारे उभे राहतात. त्यामुळे इतकर क्षेत्रात चमकदार कामगिरी करणारी गुणी व्यक्तीमत्व मात्र प्रसिद्धीपासून दूरच राहतात. आपल्या कामाच्या माध्यमातून स्वत:चं वेगळं स्टाईल स्टेटमेंट तयार करणाऱ्या, आपल्या कर्तत्वातून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या स्टायलिश व्यक्तिमत्वांचा गौरव करण्यात येत आहे. मुंबईत हा दिमाखदार सोहळा संपन्न होत आहे.
LIVE
12:00 AM
लग्नानंतर सुरक्षित वाटतं, जमिनीवर राहायला शिकलोय- रणवीर सिंग
11:52 PM
सेक्रेड गेम्सनं चौकट मोडीत काढली- रणवीर सिंग
11:49 PM
सेक्रेड गेम्सला मिळालेलं यश अभूतपूर्व; प्रेक्षक वेब सीरिजला उत्तम प्रतिसाद देताहेत- रणवीर सिंग
11:46 PM
मला खूप संधी मिळाल्या, त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो- रणवीर सिंग
11:44 PM
संपूर्ण नोव्हेंबर महिना अतिशय आनंदात गेला- रणवीर सिंग
11:42 PM
शायना एन सीठरल्या लोकमत मोस्ट स्टायलिश राजकारणी
11:39 PM
बॉलिवूडचा स्टार रणवीर सिंग ठरला लोकमत मोस्ट स्टायलिश सुपरस्टार अवॉर्डचा मानकरी
11:38 PM
लोकमत मोस्ट स्टायलिश यूथ आयकॉन ठरला डॅशिंग अभिनेता कार्तिक आर्यन
11:12 PM
लोकमत मोस्ट स्टायलिस्ट उद्योजक ठरले गौरव आणि रुची राठोड
11:07 PM
'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड'च्या रेड कार्पेटवर काय म्हणाली प्रिया बापट?
11:04 PM
अजय-अतुल यांना लोकमत मोस्ट स्टायलिश संगीतकार पुरस्कार
11:02 PM
देधडक, कर्तव्यदक्ष प्रवीण परदेशी ठरले लोकमत 'स्टायलिश' प्रशासकीय अधिकारी
10:51 PM
भूमी पेडणेकर ठरली लोकमत मोस्ट स्टायलिश रायझिंग स्टार
10:44 PM
मोस्ट स्टायलिश पब्लिक हेल्थ अॅडव्होकेट पुरस्काराची मानकरी ऋजुता दिवेकर
10:43 PM
सोनू निगमठरला लोकमत मोस्ट स्टायलिश गायक
10:37 PM
मसाबा गुप्ता ठरली मोस्ट स्टायलिश फॅशन स्टायलिस्ट
10:35 PM
प्रिया बापट ठरली 'मोस्ट स्टायलिश' नायिका
10:26 PM
अभिनेता राजकुमार राव ठरला लोकमत मोस्ट स्टायलिश पॉवर परफॉर्मर
10:22 PM
'धडक'ची नायिका जान्हवी कपूर ठरली लोकमत मोस्ट स्टायलिश डेब्युटन्ट
10:20 PM
लोकमत मोस्ट स्टायलिश अभिनेता ठरला आदिनाथ कोठारे
10:16 PM
लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात स्टायलिश मार्केटिंग ट्रेंडसेटर ठरले राजेश खानविलकर
10:14 PM
'रांची डायरीज'ची नायिका सौंदर्या शर्मा ठरली लोकमत मोस्ट स्टायलिश दिवा
10:12 PM
लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड रायझिंग फॅशन डिझायनर ठरली 'निर्मोहा'ची संस्थापक प्रिती जैन नैनुतिया
10:12 PM
अग्रवाल स्टडी सेंटरचे जगदीश अग्रवाल ठरले लोकमत मोस्ट स्टायलिश एज्युकेशनिस्ट
09:59 PM
लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सला सुरुवात
09:39 PM
लोकमतच्या सोहळ्याला कलाकारांची मांदियाळी
09:15 PM
लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सला मराठीतील नामवंत कलाकारांची उपस्थिती
09:10 PM
सिनेमा, संगीत, फॅशन, राजकारण, प्रशासन, उद्योग, शिक्षण, कला क्षेत्रातील स्टायलिश व्यक्तिमत्वांचा होणार सन्मान
08:45 PM
थोड्याच वेळात होणार स्टायलिश व्यक्तिमत्वांचा सन्मान