लोकमत नॉलेज फोरम: व्हायरल व्हिडिओज, फॉलोअर्स, ट्रोल्स आणि ‘नंबर गेम’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 12:50 AM2021-02-26T00:50:15+5:302021-02-26T00:50:32+5:30

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी उलगडली ‘व्हायरल’ होण्याच्या आगची - मागची गोष्ट

Lokmat Knowledge Forum: Viral videos, followers, trolls and 'number games' | लोकमत नॉलेज फोरम: व्हायरल व्हिडिओज, फॉलोअर्स, ट्रोल्स आणि ‘नंबर गेम’

लोकमत नॉलेज फोरम: व्हायरल व्हिडिओज, फॉलोअर्स, ट्रोल्स आणि ‘नंबर गेम’

Next

मुंबई : स्पर्धेत टिकून राहील आणि ‘व्हायरल’ होईल असा ‘कंटेन्ट’ तयार करण्याचा ताण, आपापले फॉलोअर्स जपण्याची-वाढवण्याची शर्यत, कोविड  काळात सारे जगणेच कुलूपबंद झालेले असताना रोचक विषय शोधण्याची धडपड आणि ट्रोल धाडीचा सामना करण्याचे मार्ग... सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स नावाच्या एका तरुण जगाची ही रोचक कहाणी उलगडत गेली ‘लोकमत नॉलेज फोरम’मध्ये!  निमित्त होते ‘सोशल मीडिया - इज इट ऑल अबाउट नंबर्स?’ या वेबिनारचे. 

‘लोकमत’चे संपादकीय आणि कार्यकारी संचालक  ऋषी दर्डा यांच्याबरोबरच्या अत्यंत उत्फुल्ल संवादात तरुण मनांवर राज्य करणाऱ्या सोशल मीडियातील ख्यातनाम इन्फ्लुअन्सर्सनी  फॉलोअर्स-लाइक्स-व्ह्यूजच्या आकड्यांचा खेळ उलगडून सांगितला. या वेबिनारमध्ये मालिनी अग्रवाल, निक, अभिराज आणि नियती, रणवीर अलाहबादिया आणि मासूम मिनावाला हे यू-ट्यूबर्स सहभागी झाले.
कोरोनात जग ‘बॅक टू बेसिक्स’कडे वळल्यानंतर घरात-जगण्यात स्वत:चा सामना करत ‘कंटेन्ट’ निर्मिती करताना आभासी जगाला वास्तवाचे पाय कसे लाभले, हे सर्वांनीच सांगितले.

‘सोशल मीडियात  व्हायरल होण्याचे काही नेमके सूत्र आहे का?’- या प्रश्नाचे नेमके उत्तर  किती अवघड  असते, याचा अनुभव सर्वांच्याच गाठीशी होता. ‘सोशल मीडियात प्रसिद्धी आधी मिळते आणि यश नंतर येते, त्यामुळे ‘व्हायरल’ होण्यापेक्षा दर्जातील सातत्य टिकवणे, आपला प्रभाव निर्माण करून तो कायम ठेवणे हे जास्त महत्त्वाचे ठरते. ‘सातत्य’ आणि ‘नावीन्य’ हे इथल्या यशाचे  गमक आहे.- यावरही  सर्वांचेच  एकमत झाले.

ईर्ष्येची कहाणी 

तरुणच नाही तर अगदी किशोरवयीन मुलेही  ज्या ‘इन्फ्लुअन्सर्स’चा एकेक शब्द जिवाचा कान करून ऐकतात, त्यांच्या जगातील ताणेबाणे उलगडणारा हा वेबिनार वरवर अत्यंत आकर्षक दिसणाऱ्या  आभासी जगातील सातत्याची, मेहनतीची आणि ईर्ष्येचीही कहाणी उलगडणारा होता.

Web Title: Lokmat Knowledge Forum: Viral videos, followers, trolls and 'number games'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.