लोकमत इम्पॅक्ट: ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी उपोषण घेतले अखेर मागे, मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 08:45 PM2021-03-01T20:45:25+5:302021-03-01T20:48:00+5:30

'उचल्या' या आत्मकथनामुळे जागतिक स्तरावर प्रसिद्ध झालेले जेष्ठसाहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी गेल्या शुक्रवार पासून पत्नी आणि कामगारांसह कॅन्टीनच्या आत कोंडून घेत उपोषण आंदोलन सुरु केले होते.

Lokmat Impact writer Laxman Gaikwad calls off hunger strike | लोकमत इम्पॅक्ट: ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी उपोषण घेतले अखेर मागे, मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार

लोकमत इम्पॅक्ट: ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी उपोषण घेतले अखेर मागे, मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार

Next

मनोहर कुंभेजकर

मुंबई: 'उचल्या' या आत्मकथनामुळे जागतिक स्तरावर प्रसिद्ध झालेले ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी गेल्या शुक्रवारपासून पत्नी आणि कामगारांसह कॅन्टीनच्या आत कोंडून घेत उपोषण आंदोलन सुरु केले होते. फिल्म सिटी प्रशासनाने त्यांच्या कॅन्टीनचे वीज व पाणी बंद केल्यावर अंधारातच त्यांचे उपोषण सुरू होते. माझी लढाई शेवटच्या श्वासा पर्यंत असून मी उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली होती.

भटक्या विभूक्तांचे दुःख आपल्या साहित्यातून मांडणाऱ्या या साहित्यिकाचे रोजगाराचे साधनच चित्रपट नगरी प्रशासनाने हिरावून घेतले आहे. त्यामुळे या साहित्यिकाला त्याचे उदरनिर्वाहाचे साधन परत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा असे पत्र साहित्यिकांनी पाठवले होते.

आज अखेर शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली. चौथ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज सायंकाळी 5.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांच्याशी थेट संपर्क साधला. यावेळी चित्रपट नगरीच्या  मॅनेजिंग डायरेक्टर मनीषा वर्मा,साहित्यिक अर्जुन डांगळे उपस्थित होते. सुमारे अर्धा तास व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्हाला न्याय देणार असून येत्या तीन चार दिवसात विशेष बाब म्हणून शासन तोडगा काढेल असे ठोस आश्वासन डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले. अखेर मला चित्रपट नगरीच्या अधिकाऱ्यांनी ज्यूस पाजल्यावर मी आज सायंकाळी 6 वाजता उपोषण मागे घेतले अशी माहिती लक्ष्मण गायकवाड यांनी लोकमतला दिली.

लोकमतने गेली दोन तीन दिवस लोकमत ऑनलाईन आणि लोकमतमध्ये वृत्त देऊन आपल्या समस्येला वाचा फोडल्याबद्धल उचलेकारांनी लोकमतचे आभार मानले.

गेल्या शुक्रवारी सदर आंदोलन सुरू होताच उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदर प्रकरणी लक्ष घालून त्यांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली होती.शासनाने एक चांगला निर्णय घेतला असून उचलेकारांच्या कँटीन मध्ये आपण खास शिवभोजन थाळीचा आस्वाद घ्यायला जाणार असल्याचे खासदार शेट्टी यांनी लोकमतला सांगितले.

उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ  शेट्टी,स्थानिक आमदार सुनील प्रभू, आमदार रवींद्र वायकर,माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ राठोड,माजी आमदार प्रकाश शेंडगे, आठवले गट,भटक्या विभूक्त जमातीचे नेते मच्छिद्र भोसले, साहित्यिक अर्जुन डांगळे,साहित्यिक महेश केळूसकर आदी मान्यवरांनी आपल्याला मोलाचे सहकार्य केल्याचे गायकवाड यांनी शेवटी सांगितले.

Web Title: Lokmat Impact writer Laxman Gaikwad calls off hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.