मतमोजणीत घोळ : अमोल कीर्तिकरांचे आयोगाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 07:44 AM2024-06-12T07:44:38+5:302024-06-12T07:45:14+5:30

Lok Sabha Election Result 2024: मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अमोल कीर्तिकर यांनी निकालाविरोधात  केंद्रीय निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे.

Lok Sabha Election Result 2024: Confusion in counting of votes: Amol Kirtikar's letter to the commission | मतमोजणीत घोळ : अमोल कीर्तिकरांचे आयोगाला पत्र

मतमोजणीत घोळ : अमोल कीर्तिकरांचे आयोगाला पत्र

 मुंबई  - मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अमोल कीर्तिकर यांनी निकालाविरोधात  केंद्रीय निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे. या मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत अनेक फेरफार झाले असून, याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे अमोल कीर्तिकर यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ४८ मतांनी पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर महाविकास आघाडीतील अनेकांनी या निकालाविरोधात संशयही व्यक्त केला होता. त्यानंतर आता  कीर्तिकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी मंगळवारी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडेही यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. 

Web Title: Lok Sabha Election Result 2024: Confusion in counting of votes: Amol Kirtikar's letter to the commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.