Join us

मोठी बातमी! मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 19:38 IST

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा सुरू आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीने अजूनही मुंबईतील उमेदवारी जाहीर केलेली नाही. दरम्यान, महाविकास आघाडीने  मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे.  मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड उमेदवारी जाहीर केली आहे. 

“शरद पवार कृषीमंत्री, मुख्यमंत्री होते, मग अशी वेळ का आली?”; शपथपत्रावरुन CM शिंदेंचा सवाल

गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरुन तिढा सुरू असल्याची चर्चा सुरू होती. यात मुंबई आणि सांगली लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा होती. काँग्रेसच्या वर्षा गायकवाडही उमेदवारीवरुन नाराज असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, आता वर्षा गायकवाड यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. 

टॅग्स :वर्षा गायकवाडलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४