"मंगलप्रभात लोढांनी शपथेचा भंग केला, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा" अनिल परब आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 17:51 IST2026-03-30T17:46:18+5:302026-03-30T17:51:23+5:30

लोढा यांनी विशिष्ट ठिकाणीच गॅस देण्याचे सांगून शपथेचा भंग केला आहे," असा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला आहे.

"Lodha broke his oath on Tuesday morning, the Chief Minister should resign" Anil Parab is aggressive | "मंगलप्रभात लोढांनी शपथेचा भंग केला, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा" अनिल परब आक्रमक

"मंगलप्रभात लोढांनी शपथेचा भंग केला, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा" अनिल परब आक्रमक

राज्यात इंधन आणि गॅस टंचाईवरून गोंधळाचे वातावरण असताना, भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतलेल्या एका भूमिकेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. "मंत्रिपदाची शपथ घेताना भेदभाव न करण्याचे आश्वासन दिले जाते, मात्र लोढा यांनी विशिष्ट ठिकाणीच गॅस देण्याचे सांगून शपथेचा भंग केला आहे," असा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला आहे.

अनिल परब म्हणाले की, "मुख्यमंत्री सांगत आहेत की राज्यात डिझेल, पेट्रोल आणि गॅसची कमतरता नाही, नागरिकांनी रांगा लावू नका. मात्र, मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणतात की 'जैन देरासर'मध्ये गॅस सिलेंडर द्यावे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला इंधन मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मग असा भेदभाव का? लोढा यांनी आपल्या शपथेचा भंग केला असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घ्यायला हवा."

नितेश राणेंना चोख प्रत्युत्तर

नितेश राणे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना परब यांनी थेट पंतप्रधान मोदींचा दाखला दिला. "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः नवाब शरीफ यांच्या वाढदिवसाला गेले होते. मग नवाब शरीफ तुमचे बॉस आहेत का, हे आधी त्यांनी कबूल करावे," असा पलटवार परब यांनी केला.

"कोणी कोणाला भेटायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यावर मी भाष्य करणार नाही," असे सांगून परब यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. पक्षात होणाऱ्या बैठकांवर बोलताना ते म्हणाले की, अशा पद्धतीच्या राजकीय बैठका नेहमीच होत असतात आणि ही देखील एक संघटनात्मक बैठक होती.

Web Title : लोढ़ा के इस्तीफे की मांग, शपथ उल्लंघन का आरोप, परब आक्रामक।

Web Summary : अनिल परब ने मंत्री लोढ़ा पर एक विशेष समुदाय को गैस आपूर्ति प्राथमिकता देने का आरोप लगाया, जिससे शपथ का उल्लंघन हुआ। उन्होंने मुख्यमंत्री से लोढ़ा का इस्तीफा मांगने की मांग की। परब ने नितेश राणे की आलोचना का भी जवाब दिया।

Web Title : Parab demands Lodha's resignation for alleged oath breach, favoritism.

Web Summary : Anil Parab accuses Minister Lodha of violating his oath by prioritizing gas supply to a specific community. He demands the CM to seek Lodha's resignation. Parab also countered Nitesh Rane's criticism by referencing PM Modi's past actions.