Lockdown : 'Weekend' also has strict restrictions, not a complete lockdown; Read the rules | Lockdown : 'विकेंड'लाही कडक निर्बंधच, संपूर्ण लॉकडाऊन नाही; वाचा नियमावली

Lockdown : 'विकेंड'लाही कडक निर्बंधच, संपूर्ण लॉकडाऊन नाही; वाचा नियमावली

ठळक मुद्देसरकारने विकेंड लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असून अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, नागरिकांना एकप्रकारे थोडीसी सूट मिळाली आहे

मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाच कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 लाखांवर पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादले आहेत. मात्र, 5 दिवस कडक निर्बंध आणि आठवड्याच्या शेवटचे 2 दिवस लॉकडाऊन असणार होता. मात्र, सरकारने विकेंड लॉकडाऊन नियमावली जाहीर केल्यानंतर शनिवारी आणि रविवारीही कडक निर्बंधच लागू केले आहेत. त्यामुळे, विकेंड लॉकडाऊन न लादता संपूर्ण आठवडाभर कडक निर्बंधच राज्यात लागू करण्यात आले आहेत.  

राज्य सरकारने कडक निर्बंध लादल्यापासून राज्यातील विविध व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेऊन यास विरोध दर्शवला होता. तसेच, दुकाने उघडण्यासाठी आम्हाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही केली होती. मात्र, सरकारने अद्याप व्यापाऱ्यांची मागणी मान्य केली नसली तरी, विकेंड लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे, या काळात सर्वच दुकाने बंद राहणार होते. मात्र, सरकारने विकेंड लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असून अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, लॉकडाऊनऐवजी संपूर्ण आठवडाभर कडक निर्बंधच राहणार असल्याचे आत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे,  लोकांमधील संभ्रमही दूर झाला आहे. पण, विनाकारण घराबाहेर न पडण्याचेही नवीन आदेशात राज्य सरकारकडून सूचविण्यात आले आहे.  

दरम्यान, राज्यातील अनेक घटकांनी, व्यापारी संघटनांनी  राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं होतं. तसेच, काहींनी परवानगी न दिल्यास दुकाने खुली करण्याचा इशाराही दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडून विकेंडला देखील सवलत देण्यात आली असेल, असेही सांगण्यात येत आहे.

जाणून घ्या, वीकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहणार?

- कोणतही ठिकाण जे अत्यावश्यक वस्तू विकत असेल ते 10 आणि 11 एप्रिलला सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत कोरोनाच्या कडक निर्बंधांसह सुरू राहणार आहे.

- जर ते विविध वस्तू ज्या अत्यावश्यक वस्तूंमध्ये येत नाहीत त्या विकत असतील तर ते बंद राहतील.

- अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. कोणीही व्यक्ती महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकणार नाही.

- कोरोना नियमांचं पालन करत एपीएमसी मार्केट सुरू राहणार. मात्र जर स्थानिक प्रशासनाला वाटलं की नियमांचं उल्लंघन होत आहे तर ते राज्य सरकारकडून परवानगी घेऊन मार्केट बंद करू शकतात.

- बांधकामासाठी वस्तू पुरवणारी दुकानं बंद राहतील.

- गॅरेज सुरू राहतील.

- ढाबे सुरू असतील मात्र, तिथे देखील टेक अवे होम आणि होम डिलीव्हरी पर्याय उपलब्ध असेल.

- 4 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार नागरीक दारु होम डिलिव्हरी पद्धतीनं खरेदी करू शकतात. मात्र, निश्चित करण्यात आलेल्या वेळेतचं दुकानांकडून सेवा दिली जाईल.

- इलेक्ट्रिक उपकरणाचीदुकानं बंद असतील.

- सेतू कार्यालय, नागरीक सेवा केंद्र सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असतील.

- रेस्टॉरंट आणि बार स्थानिक प्रशासनान लावलेल्या नियमांसह सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत फक्त पार्सल सुविधेसह सुरू असतील.

आरटीपीसीआर ऐवजी रॅपिड अँटिजेन टेस्टला परवानगी

राज्यात वेगाने लसीकरण सुरू आहे. ज्यांचं लसीकरण झालेलं नसेल त्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक केल्या होत्या. तिथे आता पर्याय म्हणून रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे.10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आपले सरकार सेवा केंद्र, पासपोर्ट सेवा, सेतू केंद्र आठवड्यात सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहू शकतात. वृत्तपत्रांमध्ये मासिके, नियतकालिके, जर्नल्स यांचा देखील आवश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lockdown : 'Weekend' also has strict restrictions, not a complete lockdown; Read the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.