Lockdown : आरोग्य यंत्रणावरील भार गांभीर्यानं घ्यायला हवा, पंकजा मुंडेंचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 07:14 PM2021-04-10T19:14:44+5:302021-04-10T19:19:04+5:30

Lockdown : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका घेत लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन केलं जाण्याची दाट शक्यता आहे

Lockdown : The burden on the health system should be taken seriously, said Pankaja Munde | Lockdown : आरोग्य यंत्रणावरील भार गांभीर्यानं घ्यायला हवा, पंकजा मुंडेंचं सूचक विधान

Lockdown : आरोग्य यंत्रणावरील भार गांभीर्यानं घ्यायला हवा, पंकजा मुंडेंचं सूचक विधान

Next
ठळक मुद्देराज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे, व्यापारी वर्गात तीव्र असंतोष आहे, पण लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे सरकारने म्हटलंय.

मुंबई - राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण, रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नसल्यानं राज्य सरकार आता मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील कोरोना स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी लॉकडाऊन संदर्भात सूचक ट्विट केलंय. एकप्रकारे लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे पंकजा यांनी म्हटलंय.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका घेत लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन केलं जाण्याची दाट शक्यता आहे. (Maharashtra Govt Complete Lockdown In The State Once Again Hints CM Uddhav Thackeray) सर्वपक्षीय बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोना स्थितीची माहिती सर्वांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. 

राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे, व्यापारी वर्गात तीव्र असंतोष आहे, पण लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे सरकारने म्हटलंय. त्याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक सुरू आहे. दुसरीकडे पंकजा मुंडेंनीही सूचक ट्विट केलंय. 'लॉकडाऊन'मुळे जरी गरिबांची, व्यापाराची, अर्थव्यवस्थेची परिस्थिती कठीण होईल, तरी पर्याय काय आहे?, असा प्रश्न पंकजा यांनी विचारला आहे. कोरोनाची साखळी कशी तोडणार?मजुर आणि उद्योजकांना नोकरदारांना विश्वास देणे आवश्यक आहे. तसेच, आरोग्य यंत्रणांवरील भार हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असेही पंकजा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 

मुख्यंत्र्यांची भूमिका

कोरोना लसीचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. सध्या कोरोनाची साखळी तोडणं गरजेचं आहे आणि लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कळत नकळत कोरोनाचा प्रसार होतोय आणि हे सर्वात घातक आहे. राज्यात तरुण पिढीलाही कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होतेय. कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर परिस्थिती गंभीर होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, असंही मत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे राज्यात संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.

Web Title: Lockdown : The burden on the health system should be taken seriously, said Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.