LMOTY 2023: तुम्ही बसल्या जागी मीडियाला कामाला लावता; मीडिया हँडलिंग कसं जमतं? राज ठाकरे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 20:25 IST2023-04-26T20:20:40+5:302023-04-26T20:25:20+5:30
'तुम्ही जेवढा माझ्या भाषणाचा विचार करता, तेवढा मीदेखील करत नाही.'

LMOTY 2023: तुम्ही बसल्या जागी मीडियाला कामाला लावता; मीडिया हँडलिंग कसं जमतं? राज ठाकरे म्हणाले...
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवण्यात येते. या पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली.
मीडिया हँडलिंग कसं जमतं?
यावेळी अमोल कोल्हे यांनी विचारलं की, आज भारतात दोन अशी व्यक्ती आहेत, जी बोलले तरी बातमी होते आणि न बोलले तरी बातमी होते. एक शरद पवार आणि दुसरे राज ठाकरे. ही दोन व्यक्तीमत्व अशी आहेत, ही बसल्या जागी देशभरातील मीडियाला कामाला लावू शकतात. मीडियाला हँडल करण्याचे स्किल तुम्ही कसे आत्मसात केले?
यावर राज ठाकरे म्हणाले की, हे स्किल-बिल काही नाहीये. मला जे बोलायचं ते मी बोलतो. मी मागे आमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोललो होतो, तेव्हा खूप वाद झाला होता. अमिताभ बच्चन या एवढ्या मोठ्या माणसाला त्यांच्या राज्याबद्दल एवढा अभिमान आहे, तर माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीला माज्या राज्याबद्दल अभिमान असणारच ना, असं राज ठाकरे म्हणाले.
मी माझ्या भाषणाचा विचार करत नाही...
कोल्हे पुढे म्हणाले की, तुमचं भाषण सचिन तेंडुलकरच्या स्ट्रेट ड्राइव्हसारखं फ्लॉलेस आणि धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटसारखं फटकेबाज असतं. तुम्हाला तुम्ही बोलत असलेल्या प्रत्येक शब्दाची जाण आहे, असं जाणवतं. यावर राज ठाकरे म्हणाले की, तुम्हाला समोरुन काय जाणवतं माहिती नाही, पण मी त्या जाणीवेतून भाषण नाही करत.
मला घरात जे वातावरण मिळालं, व्यंगचित्रांचा वारसा माझ्यात आला, बातमीतून व्यंगचित्र कसं शोधावं, ते मला कळतं. तोच अभ्यास माझ्या भाषणाला उपयोगी पडतो. नेमकं पाहणं, त्यातूनच मला आलंय. तुम्ही जेवढा माझ्या भाषणाचा विचार करता, तेवढा मीदेखील करत नाही. जेनेटिकली हजरजबाबीपणा आला असेल, बाकी काही नाही, असं राज ठाकरे म्हणाले.