CoronaVirus : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी ठेवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 02:17 AM2020-03-27T02:17:45+5:302020-03-27T05:41:08+5:30

coronavirus : वर्षा येथे कोरोना उपाययोजनांसंदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली.

 Livestock shops should be open for 24 hours, Chief Minister Uddhav Thackeray announced | CoronaVirus : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी ठेवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

CoronaVirus : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी ठेवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

Next

मुंबई : सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर केले आहे. वर्षा येथे कोरोना उपाययोजनांसंदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली. लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न-धान्य खरेदी करता यावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात, असेही ठरले.

Web Title:  Livestock shops should be open for 24 hours, Chief Minister Uddhav Thackeray announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.