हमासच्या समर्थनार्थ पाेस्टला लाइक केले; सोमय्या स्कूलच्या प्राचार्यांना नाेटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 06:31 AM2024-05-05T06:31:59+5:302024-05-05T06:32:18+5:30

इस्त्रायलमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या हमास या संघटनेविषयी शेख यांना सहानुभूती आहे, तसेच त्या हिंदूविरोधी आहेत, इस्लामवादी उमर खलिदविषयी सहानुभूती बाळगत आहेत, असा आक्षेप ऑनलाइन पोर्टलमधील लिखाणात घेण्यात आला होता.

Liked a post in support of Hamas; Congratulations to the Principal of Somaiya School | हमासच्या समर्थनार्थ पाेस्टला लाइक केले; सोमय्या स्कूलच्या प्राचार्यांना नाेटीस

हमासच्या समर्थनार्थ पाेस्टला लाइक केले; सोमय्या स्कूलच्या प्राचार्यांना नाेटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हमास या संघटनेच्या समर्थनार्थ काही पोस्ट्सना लाइक केल्याबद्दल विद्याविहार येथील दी सोमय्या स्कूलच्या प्राचार्य परवीन शेख यांना व्यवस्थापनाने लेखी खुलासा करण्यास सांगितले आहे.

शेख यांनी केलेल्या पोस्टविषयी एका ऑनलाइन पोर्टलवर २४ एप्रिलला लेख प्रसिद्ध झाल्यानंतर व्यवस्थापनाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. आपल्या कृतीचा खुलासा करावा.  अन्यथा कारवाई का करू नये, अशी लेखी विचारणा करणारी नोटीस व्यवस्थापनाने शेख यांना पाठविली आहे.

इस्त्रायलमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या हमास या संघटनेविषयी शेख यांना सहानुभूती आहे, तसेच त्या हिंदूविरोधी आहेत, इस्लामवादी उमर खलिदविषयी सहानुभूती बाळगत आहेत, असा आक्षेप ऑनलाइन पोर्टलमधील लिखाणात घेण्यात आला होता. त्यांनी समाजमाध्यमावर लाइक केलेल्या पोस्टच्या आधारे हा आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर व्यवस्थापनाने त्यांना जाब विचारला आहे. 

Web Title: Liked a post in support of Hamas; Congratulations to the Principal of Somaiya School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.