मुंबईत 'या' ठिकाणी बिल्डिंगखाली बिनधास्त फिरतोय बिबट्या, Video झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 05:30 PM2022-01-18T17:30:38+5:302022-01-18T17:46:00+5:30

शहरातील उच्चभ्रू परिसरात एक बिबट्या (Leopard in Mumbai video) फिरताना दिसला आहे. हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Leopard video).

leopard in Gokuldhaam Goregaon captured in cctv video goes viral on social media | मुंबईत 'या' ठिकाणी बिल्डिंगखाली बिनधास्त फिरतोय बिबट्या, Video झाला व्हायरल

मुंबईत 'या' ठिकाणी बिल्डिंगखाली बिनधास्त फिरतोय बिबट्या, Video झाला व्हायरल

Next

मुंबईत बरेच लोक रात्री शतपावली करण्यासाठी किंवा पाय मोकळे करण्यासाठी म्हणून घराबाहेर पडतात. पण आता तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण मुंबईत चक्क एक बिबट्या घुसला आहे (Leopard in Mumbai). शहरातील उच्चभ्रू परिसरात एक बिबट्या (Leopard in Mumbai video) फिरताना दिसला आहे. हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Leopard video).

मुंबईतील उच्चभ्रू परिसरातील कॉलनीबाहेर बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये दहशत आहे. कॉलनी, बिल्डिंगच्या गेटसमोर तसंच अगदी पार्किंगमध्येही हा बिबट्या दिसून आला आहे. बिबट्याचे तब्बल ३ व्हिडीओ समोर आले आहेत. एका व्हिडीओत बिबट्या कॉलनीच्या गेटबाहेर फेऱ्या मारताना दिसतो. त्यानंतर तो थोडावेळ गेटबाहेर बसतो. एका व्हिडीओत तो चक्क एका बिल्डिंगच्याच गेटबाहेर उभा असल्याचं दिसतो आहे. सुदैवाने बिल्डिंगचा गेट बंद होता त्यामुळे बिबट्या बिल्डिंगमध्ये घुसला आहे. एका व्हिडीओ तो पार्क गेलेल्या गाड्यांजवळ उभा आहे.

हा व्हिडीओ मुंबईच्या गोरेगाव परिसरातील असल्याचं सांगितलं जातं आहे (leopard in Goregaon gokuldham society). विराट सिंह नावाच्या ट्विटर युझरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा बिबट्या मुंबईतील गोरेगाव पूर्वतील गोकुलधाम परिसरात दिसला आहे. वनविभागाने सीसीटीव्ही फुटेज पाहिलं आहे. संजय गांधी नॅशनल पार्कचे चीफ कन्झर्व्हेटर जी. मल्लिकार्जुन यांनी परिसरातील लोकांना घाबरण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. या परिसरात वनविभागाचे कर्मचारी तैनात केले जातील, असं त्यांनी सांगितलं.

Web Title: leopard in Gokuldhaam Goregaon captured in cctv video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app