Join us
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 06:46 IST

विधेयके व पुरवणी मागण्या मांडल्या जातील. प्रश्नोत्तरांचा तास व लक्षवेधी या अधिवेशनात नसेल.

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. कोरोनामुळे केवळ दोनच दिवस कामकाज होईल. आधी अधिवेशन लांबणीवर टाकले होते. मात्र, आता सोमवारपासून ते पार पडेल. याच्या पूर्वसंध्येला होणारे चहापान रद्द केले आहे. खबरदारीसाठी दोन्ही सभागृहाचे सदस्य, विधिमंडळाचे कर्मचारी, आमदारांचे स्वीय सहायक व पत्रकारांची चाचणी केली आहे. यात फक्त विधेयके व पुरवणी मागण्या मांडल्या जातील. प्रश्नोत्तरांचा तास व लक्षवेधी या अधिवेशनात नसेल.

उपाध्यक्ष पाहतील कामकाज

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे ते या अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडेल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली.

बैठक व्यवस्थेत बदल

सभागृहतील बैठक व्यवस्थाही बदलली आहे. एका सदस्यानंतर दोघांची जागा सोडली जाणार आहे. त्यामुळे काही जणांना प्रेक्षक गॅलरीत देखील बसवले जाईल.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकारविधान परिषद