कोकणातील एलईडी मासेमारी आता बंद होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 10:18 IST2026-03-25T10:18:18+5:302026-03-25T10:18:18+5:30

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत चर्चेला उत्तर देताना सांगितले.

LED fishing in Konkan will now be banned | कोकणातील एलईडी मासेमारी आता बंद होणार 

कोकणातील एलईडी मासेमारी आता बंद होणार 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात अनधिकृतपणे सुरू असलेली एलईडी मासेमारी पूर्णतः बंद करण्याचा निर्धार सरकारने केला असून, यासाठी कडक उपाययोजना राबवण्यात येतील, असे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत चर्चेला उत्तर देताना सांगितले.

राणे म्हणाले, एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर मासेमारीवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. गुजरात आणि गोव्यातून अनेकदा फोन येतात. मात्र आम्ही त्याला दाद देत नाही. आमच्या राज्यातील मच्छीमारांचे हक्क अबाधित ठेवणार, असे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले. या चर्चेत भास्कर जाधव, संजय केळकर, आदित्य ठाकरे, शेखर निकम आदींनी सहभाग घेतला.

देवगडला मत्स्य विद्यापीठ 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, वेंगुर्ला येथे ६० कोटी रुपये खर्चून मत्स्यबीज उपकेंद्र उभारले जाणार आहे. जलवाहतूक वाढवण्यासाठी ६,६०० कोटींची तरतूद केली असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जलवाहतुकीच्या सुविधा वाढवण्यात येणार आहेत, असेही  नितेश राणे यांनी सांगितले.

 

Web Title : कोंकण में एलईडी मछली पकड़ना होगा बंद: सरकार का फैसला

Web Summary : सरकार ने अवैध एलईडी मछली पकड़ने पर पूरी तरह से प्रतिबंध लगाने का फैसला किया है, पारंपरिक मछुआरों के अधिकारों को प्राथमिकता दी जाएगी। देवगढ़ में मत्स्य विश्वविद्यालय और वेंगुरला में मत्स्य बीज उप-केंद्र स्थापित किया जाएगा। रत्नागिरी और सिंधुदुर्ग में जलमार्ग विकास के लिए ₹6,600 करोड़ आवंटित।

Web Title : LED Fishing in Konkan to be Banned: Government Decision

Web Summary : The government is determined to completely ban illegal LED fishing, prioritizing traditional fishermen's rights. A fisheries university will be established in Devgad, and a fish seed sub-center in Vengurla. ₹6,600 crore allocated for waterway development in Ratnagiri and Sindhudurg.