Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: नारायण राणेंच्या इशाऱ्याला अजित पवारांच एकाच शब्दात उत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 12:57 IST

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजपचे नेते नारायण राणे यांच्यात गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

मुंबई- विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे नेते नारायण राणे यांच्यात गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'पुण्यात एका सभेत बोलताना अजित पवारांनी नारायण राणेंवर जोरदार टीका करत राणेंना पराभवाची आठवण करुन दिली होती, या टीकेला प्रत्युत्तर दिले,'माझ्या नादाला लागू नका, पुण्यात येऊन बारा वाजवीन' असा इशारा राणे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिला होता. यावर आता अजित पवार यांनी एका शब्दात उत्तर दिले आहे.  (Maharashtra Politics News)

अजित पवारांच्या या टीकेला मंत्री राणे यांनी प्रत्युत्तर देताना, राणे यांनी थेट दमच देत अजित पवारांचे पुण्यात येऊन बारा वाजवीन, माझ्या नादाला लागू नका, अशा शब्दात इशारा दिला होता. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, त्यांचे 'स्वागत' आहे. एका शब्दातच अजित पवार यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिले. 

माझ्या नादाला लागू नका, पुण्यात येऊन बारा वाजवीन, नारायण राणेंचा अजित पवारांना इशारा

अजित पवार काय म्हणाले?

शिवसेनेत जे आतापर्यंत बाहेर पडले त्यांचा पराभव झाला आहे. नारायण राणेंचाही पराभव झाला आहे, राणेंचा मुंबईत एका महिलेने पराभव केला आहे, अशी टाकी अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर केली होती.

केंद्रीय मंत्री नारायण राणे काय म्हणाले?

यावेळी बोलताना राणे म्हणाले की, अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळत मला माहीत नाही. ज्या प्रकारचा राजकारणी आहे त्याबद्दल बोलू नये. मी सलग सहावेळा निवडून आलो आहे. महिला असेल, पुरुष असेल उमेदवार हा उमेदवार असतो असेही ते म्हणाले. तर, जे लोक काम करतात त्यांचा पक्ष टिकतो, बाकीचे संपून जातात, असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला, ठाकरेंकडे राहिलं काय? कुठलंही अस्तित्व नाही. पक्षातून गेलेले लोक आपल्याबद्दल काय म्हणतात, अडीच वर्षात आपण काय केलं ते पहा म्हणावं असेही त्यांनी यावेळी सांगितले. (Maharashtra Politics News)

टॅग्स :नारायण राणे भाजपाराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार