औषधाच्या ऐवजी दुसरीच बाटली तोंडाला लावली अन्... लोअर परळमध्ये लाँड्रीचालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:21 IST2025-06-28T16:03:18+5:302025-06-28T16:21:40+5:30

मुंबईत एका लाँड्रीचालकाचा छोट्याश्या चुकीमुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

Laundry operator dies in Lower Parel after taking stain remover instead of cough medicine | औषधाच्या ऐवजी दुसरीच बाटली तोंडाला लावली अन्... लोअर परळमध्ये लाँड्रीचालकाचा मृत्यू

औषधाच्या ऐवजी दुसरीच बाटली तोंडाला लावली अन्... लोअर परळमध्ये लाँड्रीचालकाचा मृत्यू

Mumbai Laundry Operator Death:मुंबईच्या लोअर परळ भागात एका छोट्या चुकीमुळे लाँड्रीचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. खोकल्याचे औषध समजून कपड्यांवरील डाग घालवण्यासाठीचे लिक्विड प्यायल्यामुळे लाँड्रीचालकाला आपला जीव गमवावा लागला. सबाजित धोबी (वय ५९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलीस तपास करत आहेत. गुरुवारी घडलेल्या या घटेननं आजूबाजूच्या लोकांना धक्का बसला आहे. 

लोअर परळ येथील दीपक सिनेमासमोरील चाळीत सबाजित हे एकटेच राहत होते. तिथेच त्यांचा लाँड्रीचा व्यवसाय होता. काही दिवसांपूर्वी खोकला झाल्याने त्यांनी पालिकेच्या रुग्णालयातून खोकल्याचे औषध आणलं. तसेच या औषधासारख्या एका बाटलीतच त्यांनी कपड्यांवरील डाग हटविण्यासाठी आणलेले लिक्विडही ठेवले होते. दोन्ही बाटल्या त्यांनी जवळपासच ठेवल्या होत्या

बुधवारी रात्री कामाच्या ओघात जास्त त्रास होत असल्याने त्यांनी खोकल्याचे औषध समजून दुसऱ्या बाटलीतील लिक्विड प्यायले. काही वेळाने चुकून कपडे धुण्याते लिक्विड प्यायल्याची जाणीव होताच त्यांनी ती बॉटल फेकून दिली. मात्र काही त्रास न जावल्याने त्यांनी या प्रकाराकडे त्याकडे दुर्लक्ष करत ते झोपी गेले. गुरुवारी सकाळी मात्र ७:३० च्या दरम्यान नाष्टा करताना त्यांना अचानक रक्ताची उलटी झाली. शेजाऱ्यांनी त्यांना तत्काळ केईएम रुग्णालयाच्या नेले. प्रवासात सबाजित यांनी शेजाऱ्यांना आपण रात्री चुकून कपडे धुण्याचे लिक्विड प्यायल्याचे सांगितले. शेजाऱ्यांनी सबाजित यांना रुग्णालयात दाखल करुन डॉक्टरांना सगळा प्रकार सांगितला. मात्र उपचारादरम्यान संध्याकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.

पोलिसांनी सबाजित यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याच्या तपासणीसाठी काही नमुने 'फॉरेन्सिक'साठी पाठवण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे घटनास्थळी पोलिसांना ती बाटली मिळालेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून, पोलिस उपनिरीक्षक रफिक शेख तपास करत आहेत.
 

Web Title: Laundry operator dies in Lower Parel after taking stain remover instead of cough medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.