Lalpari to help railway; Five additional buses on Mumbai-Pune, Thane-Pune route | रेल्वेच्या मदतीला लालपरी; मुंबई-पुणे, ठाणे-पुणे मार्गावर ७० जादा बसेस
रेल्वेच्या मदतीला लालपरी; मुंबई-पुणे, ठाणे-पुणे मार्गावर ७० जादा बसेस

मुंंबई : मुंबई ते पुणे रेल्वे मार्गावर ३० नोव्हेंबरपर्यंत कर्जत दरम्यान तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी, प्रगती एक्स्प्रेससह अनेक एक्स्प्रेस रद्द झाल्यात. तर, २२ एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई ते पुणे, ठाणे ते पुणे या मार्गावर नियमित फेऱ्यांसह ७० जादा बस सोडण्यात येणार आहेत.

मुंबई ते पुणे रेल्वे मार्गावर ३० नोव्हेंबरपर्यंत ब्लॉक आहे. या ब्लॉकदरम्यान तांत्रिक कामे केली जातील. यादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे विभागातून २०, मुंबई विभागातून १५, पुणे विभागातून १५, शिवनेरी बस सेवेच्या २० बस अशा ७० जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त आवश्यकता भासल्यास प्रवाशांच्या गर्दीनुसार जादा बस सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून केले आहे.

मुंबईहून पुण्यात जाण्यासाठी शिवनेरीच्या १३९, तर परतीच्या प्रवासासाठी १३९ फेºया उपलब्ध आहेत. यासह ३६ निमआराम शिवनेरीच्या फेºया मुंबई-पुणे मार्गावर धावतील. मुंबई, परळ, कुर्ला येथून पुणेमार्गे २९० फेºया उपलब्ध आहेत.

Web Title: Lalpari to help railway; Five additional buses on Mumbai-Pune, Thane-Pune route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.