संतोष आंधळेलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बस दुर्घटना झाल्याच्या समोर कपड्याचे दुकान असल्याने बाबूराव कश्यप घटनास्थळी गेले. त्यावेळी जखमींना मदत करत असताना त्यांना त्यांचा मोठा मुलगा गंभीर अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी मुलाला उचलले आणि भाभा रुग्णालयात धाव घेतली पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
धारावी येथे राहणारे बाबूराव कश्यप यांचे कपड्याचे दुकान एलबीएस मार्गावर आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांचा खालसा महाविद्यालयात कॉमर्स शाखेत प्रथम वर्षात शिकणारा मुलगा शिवम दुकानावर आला होता. त्यावेळी काही काळ दुकानात बसल्यानंतर नाश्ता करण्यासाठी जवळच्या हॉटेलमध्ये गेला. त्यावेळी बाबूराव कश्यप यांना मोठा अपघात झाल्याचा आवाज झाला. त्या दिशेने ते पळाले. जखमींना ते मदत करत होते. मात्र त्याचे हे काम चालू असताना त्यांना त्याचा मुलगा गंभीर अवस्थेत आढळून आला. त्यांनी त्याला तत्काळ उचलून भाभा रुग्णालयात घेऊन गेले. मात्र त्या ठिकणी त्या मृत घोषित केले.