कुर्ला बस अपघात: स्वत:च कॉल करून कळविले, मात्र उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 10:05 IST2024-12-11T10:05:30+5:302024-12-11T10:05:43+5:30

विजय गायकवाड यांना समाजसेवेची आवड होती. निवृत्त  झाल्यानंतर त्यांनी आपल्या समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली.

Kurla Bus Accident: Reported by self call, but died during treatment | कुर्ला बस अपघात: स्वत:च कॉल करून कळविले, मात्र उपचारादरम्यान मृत्यू

कुर्ला बस अपघात: स्वत:च कॉल करून कळविले, मात्र उपचारादरम्यान मृत्यू

- संतोष आंधळे
लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई  : रेल्वे सेवेतून निवृत्त झाल्यानंतर विजय गायकवाड (७०)  क्षत्रिय मराठा समाजाचे काम करीत होते. त्यासाठी ते कुर्ला परिसरात गेले होते. भरधाव वेगाने आलेल्या बसची त्यांना धडक बसली. त्यांनी स्वतः फोन करून मुलाला जखमी झाल्याचे कळविले. त्यानंतर त्यांना भाभा रुग्णालय पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने दाखल केले. मुलाने अधिक उपचारासाठी त्यांना क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे जावई सचिन भालेकर म्हणाले. 

विजय गायकवाड यांना समाजसेवेची आवड होती. निवृत्त  झाल्यानंतर त्यांनी आपल्या समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली. सोमवारी संध्याकाळी ते सहज काही काम करण्यासाठी बाहेर पडले. त्यावेळी मागून आलेल्या बसने  जोरदार धडक दिली. त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांनी मुलाला फोन लावला व घटना सांगितली.  तोपर्यंत त्यांना भाभा रुग्णालयात दाखल केले होते.  मुलाने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालय नेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. क्रिटीकेअर रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह शविच्छेदनासाठी राजावाडी शवविच्छेदन केंद्रात पाठविण्यात आला होता. दुपारपर्यंत शवविच्छेदनाचे काम सुरूच होते. समाजातील अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते.

रिक्षातून घरी जाताना त्याला मृत्यूने गाठले
भरधाव वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसने सोमवारी एका रिक्षाला धडक दिली. यामध्ये प्रवास करणारे फारूख चौधरी (५६) हे गंभीर जखमी झाले. त्यांना भाभा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांच्या नातेवाइकाने त्यांना हबीब रुग्णालयात हलवले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. अन्सारी यांचा खासगी व्यवसाय असल्याचे समजते.

Web Title: Kurla Bus Accident: Reported by self call, but died during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.