Mumbai Building Fire: कुर्ल्यातील रहिवासी इमारतीला भीषण आग, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 15:34 IST2022-10-08T15:23:10+5:302022-10-08T15:34:21+5:30
Mumbai Building Fire: कुर्ल्यातील नवीन टिळळनगर भागातील रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. आज दुपारी दोन वाजल्यानंतर ही आग लागली असून, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल आले आहेत. तसेच अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे

Mumbai Building Fire: कुर्ल्यातील रहिवासी इमारतीला भीषण आग, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू
मुंबई - कुर्ल्यातील नवीन टिळळनगर भागातील रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. आज दुपारी दोन वाजल्यानंतर ही आग लागली असून, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल आले आहेत. तसेच अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
मुंबईतीलकुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ अजलेल्या रेल ह्यू या रहिवासी इमारतीला ही आग लागली आहे. ही आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या बारा इमारतीमधील वरच्या मजल्यावरील एका रूममध्ये ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच अग्निशमन दलाच्या आग गाड्या आग शमवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, आगीमुळे काही लोक इमारतीमध्ये अडकले आहेत. या आगीचे काही व्हिडीओ समोर आले असून, त्यामध्ये दोन व्यक्ती खिडकीतून बाहेर पडून तिथे असलेल्या स्लॅबवर उभे राहून जीव वाचवण्याच प्रयत्न करताना दिसत होते. दरम्यान, या आगीसाठी अग्निशमन दलाने २ क्रमांकाचा कॉल दिलेला आहे. आग शमवण्याचे प्रयत्न सुरू आहे.