'कुणाल कामरा झुकणार नाही, त्याचा आणि आमचा डीएनए सारखाच'; संजय राऊतांचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 23:31 IST2025-03-25T23:16:54+5:302025-03-25T23:31:44+5:30

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामरासाठी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे.

Kunal Kamra will not bow down, his and our DNA are the same Sanjay Raut's tweet | 'कुणाल कामरा झुकणार नाही, त्याचा आणि आमचा डीएनए सारखाच'; संजय राऊतांचं ट्विट

'कुणाल कामरा झुकणार नाही, त्याचा आणि आमचा डीएनए सारखाच'; संजय राऊतांचं ट्विट

Kunal Kamara ( Marathi News ) : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने रविवारी सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात एक गाणे पोस्ट केले. या गाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला आहे. यामुळे आता नवीन वाद सुरू झाला आहे. दरम्यान, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामरासाठी तीन ओळींचे एक ट्विट केले आहे. 'हा तर आपल्यासारखा निघाला. हा सुद्धा झुकणार नाही.जय महाराष्ट्र!', असं ट्विटमध्ये संजय राऊतांनी म्हटले आहे. 

प्रशासनातील अधिकाऱ्यांची पुन्हा खांदेपालट, सांगलीच्या आयुक्तांची बदली; पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

पत्रकारांसोबत संवाद साधत असतानाही राऊत यांनी कामरा याचे कौतुक केले आहे. कुणाल कामरा कोणासमोरही झुकणार नाही.त्याचा आणि कामराचा डीएनए सारखाच आहे. "मी कामराला ओळखतो. आमचा सारखाच डीएनए आहे. तो एक लढाऊ आहे," तो माफी मागणार नाही. जर तुम्हाला त्याच्याविरुद्ध कारवाई करायची असेल तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल," असंही राऊत म्हणाले.

 

कुणाल कामराचं नवं गाणं

भारताचे आणखी एक राष्ट्रगीत म्हणत कुणालने हे गाणं गायलं. "हम होंगे कंगाल एक दिन, मन में है अंधविश्वास, देश का सत्यानाश. होंने नगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर पुलिस के पंगे चारों ओर. एक दिन मन में नथूराम, हरकतें आसाराम. हम होंगे कंगाल एक दिन," असं गाणं कुणाल कामराने गायलं.

गाण्याच्या व्हिडीओमध्ये शिंदे गटाचे शिवसैनिक क्लबची तोडफोड करताना दिसत आहेत. तर काहीजण कामराच्या पुतळ्यासोबत तर काही त्याच्या फोटोसोबत दिसत आहे. व्हिडीओमध्ये शिवसेना नेते राहुल कनाल यांचेही फुटेज वापरुन त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

 

Web Title: Kunal Kamra will not bow down, his and our DNA are the same Sanjay Raut's tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.