कुणाल कामराने ठोठावले मुंबई उच्च न्यायालयाचे दार; दिलासा मिळणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:26 IST2025-04-07T11:22:58+5:302025-04-07T11:26:33+5:30
Kunal Kamra Bombay High Court: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयानंतर आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

कुणाल कामराने ठोठावले मुंबई उच्च न्यायालयाचे दार; दिलासा मिळणार का?
Kunal Kamra Latest Update: मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने आता मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. कुणाला कामराने घटनेतील काही मुद्द्यांच्या उल्लेख करत हा गुन्हा रद्द करण्याची मागणी कुणाल कामराने केली आहे. त्यामुळे कुणाल कामराला दिलासा मिळणारा की, पोलिसांना, याकडे सगळ्याचे लक्ष आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गाणे सादर केल्याने मोठा वाद झाला. या प्रकरणी कुणाल कामराविरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी कुणाल कामराने केली आहे.
वाचा >>मुस्लीम RSS मध्ये येऊ शकता का? मोहन भागवत म्हणाले, सर्व भारतियांचे स्वागत, पण...! ठेवली अशी अट
कुणाल कामराने याचिकेत म्हटले आहे की, मूलभूत हक्क असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जगण्याचा हक्का या कलम १९ आणि २१ नुसार माझ्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.व्ही. कोटवाल आणि न्यायमूर्ती एस.एम. मोडक यांच्या खंठपीठासमोर सुनावणी होणार आहे. २१ एप्रिल रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे जबाब घ्या
मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यापूर्वी कुणाल कामराने मुंबई पोलिसांना पत्र पाठवले. त्याने पोलिसांकडे विनंती केली की, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्यात यावा.
कुणाल कामराला खार पोलिसांनी आतापर्यंत तीन समन्स बजावली आहेत. २ एप्रिल रोजी तिसरे समन्स पाठवण्यात आले होते. पोलिसांनी कुणाल कामराच्या मागणीला अद्याप उत्तर दिलेले नाही.
मद्रास उच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण
कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असून, त्यामुळे त्याला अटकेपासून संरक्षण मिळालेले आहे. पण, तामिळनाडूतच हा आदेश लागू होत असल्याने कुणाल कामराने मुंबईत चौकशीला येणं टाळलं आहे. खार पोलिसांचे एक पथक ४ एप्रिल रोजी पुद्दुचेरीमध्ये त्यांच्या चौकशीसाठी गेले होते.