किशोरी पेडणेकर ईडी चौकशीला गैरहजर, चार आठवड्यांची मागितली मुदत

By मनोज गडनीस | Published: November 8, 2023 05:40 PM2023-11-08T17:40:25+5:302023-11-08T17:41:21+5:30

किशोरी पेडणेकर यांना पुढील आठवड्यात नव्याने समन्स जारी करण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकरणी मंगळवारी मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी वेलारसू यांचा ईडीने जवाब नोंदवला आहे. 

Kishori Pednekar absent from ED inquiry, four weeks time sought | किशोरी पेडणेकर ईडी चौकशीला गैरहजर, चार आठवड्यांची मागितली मुदत

किशोरी पेडणेकर ईडी चौकशीला गैरहजर, चार आठवड्यांची मागितली मुदत

मुंबई - कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ने बोलावलेल्या चौकशीला मुंबईच्या माजी महापौर यांनी बुधवारी दांडी मारली. त्याऐवजी त्यांनी आपल्या वकीलाला ईडीच्या कार्यालयात पाठवले होते व या प्रकरणाची कागदपत्रे गोळा करण्यासाठी आपल्याला चार आठवड्याचा कालावधी हवा असल्याची मागणी केली आहे.

किशोरी पेडणेकर यांना पुढील आठवड्यात नव्याने समन्स जारी करण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकरणी मंगळवारी मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी वेलारसू यांचा ईडीने जवाब नोंदवला आहे. 

कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने बॉडी बॅग्जची खरेदी वाढीव दराने केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्याच्या आधारे ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. ज्या कंत्राटदाराकडून या बॉडी बॅग्जची खरेदी करण्यात आली त्या कंत्राटदाराला कंत्राट देण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेच्या तत्कालिन महागौर किशोरी पेडणेकर यांनी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Web Title: Kishori Pednekar absent from ED inquiry, four weeks time sought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.