"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 10:32 IST2025-12-18T10:12:20+5:302025-12-18T10:32:14+5:30
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
मुंबई महानरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपामध्ये पक्षप्रवेश सुरुच आहेत. ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणुका लढणार आहेत. दोन्ही बंधूंमध्ये जागावाटपासाठी बैठका सुरू आहेत. दरम्यान, ठाकरे बंधू महाविकास आघाडीमधून निवडणूक लढणार नसल्याचे समोर आले आहे. यावरुन आता भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी, गरजेनुसार रंग बदलणारी ही निव्वळ सत्तेची नीती. लोकसभा–विधानसभा निवडणुकांत काँग्रेसची गरज होती, तेव्हा मनसेवर जहरी टीका. “संपलेला पक्ष” म्हणत हेटाळणी. राज ठाकरे यांनी कुटुंबीय म्हणून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही, पण अमित ठाकरे यांच्याबाबत उबाठाने किमान कौटुंबिक शिष्टाचारही पाळला नाही, असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला.
आज मुंबई महापालिकेत सत्ता स्वप्नात दिसू लागली आणि अचानक घोषणा “काँग्रेस–मविआ नको!” “मविआ २५ वर्षे फेव्हिकॉलसारखी टिकेल” म्हणणाऱ्यांचे शब्द हवेत विरले. काल पर्यंत, दिल्ली दरबारी सोनिया गांधी—आज दादरच्या शिवतीर्थावर हजेरी! दिशा हरवलेल्या उबाठाने, सत्तेच्या आंधळ्या हव्यासात, दिसेल त्याला जवळ केले— संभाजी ब्रिगेड, डावे पक्ष, समाजवादी… पण महापालिकेत जागा द्याव्या लागणार याची जाणीव होताच, आता त्यांची नावेही उच्चारायची हिंमत नाही, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
"सत्तेसाठी तत्वं बदलणं हेच उबाठाचं ‘ब्रँड पॉलिटिक्स’ मुख्यमंत्री असताना आमदारकीसाठी मोदींची विनवणी, आणि काम झाल्यावर लगेच टीकेचा भडिमार! उद्या मुंबई महापालिकेत पराभव झाला, तर मनसेला टाटा-बाय बाय आणि पुन्हा—नवा चेहरा, नवा साथीदार, नवी तत्त्वे!, अशा निशाणा उपाध्य यांनी लगावला.
उबाठाचे राजकारण
गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी
गरजेनुसार रंग बदलणारी ही निव्वळ सत्तेची नीती!
लोकसभा–विधानसभा निवडणुकांत काँग्रेसची गरज होती, तेव्हा मनसेवर जहरी टीका.
“संपलेला पक्ष” म्हणत हेटाळणी.
राज ठाकरे यांनी कुटुंबीय म्हणून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला…— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 18, 2025