Coronavirus : धक्कादायक! कस्तुरबा रुग्णालयात चतुर्थश्रेणी कामगारांच्या जीवाशी खेळ; साध्या किट्चं वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 08:26 PM2020-04-10T20:26:05+5:302020-04-10T20:31:08+5:30

आमच्या २ चतुर्थश्रेणी कामगारांना कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झालेला आहे, आमचं काय होणार अशी सर्व चतुर्थश्रेणी कामगारांमध्ये भीती निर्माण झालेली आहे.

Kasturba Hospital Administration's Fourth Grade Worker give Simple Kit, Plain Mask vrd | Coronavirus : धक्कादायक! कस्तुरबा रुग्णालयात चतुर्थश्रेणी कामगारांच्या जीवाशी खेळ; साध्या किट्चं वाटप

Coronavirus : धक्कादायक! कस्तुरबा रुग्णालयात चतुर्थश्रेणी कामगारांच्या जीवाशी खेळ; साध्या किट्चं वाटप

Next

मुंबईमध्ये कोरोना विषाणू बाधित रुग्ण व संशयित रुग्ण सर्वात मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल आहेत, त्यांची सेवा, सुश्रुषा करण्याचं काम डॉक्टर्स, परिचारिका सोबत चतुर्थश्रेणी कामगार करीत आहेत, रुग्णांना सेवा देण्यासाठी जी टीम कार्यरत आहे, त्यामध्ये चतुर्थश्रेणी कामगारांचाही समावेश आहे. चतुर्थश्रेणी कामगारसुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत, रुग्णांना सेवा देत असताना महिला सफाई कामगार आणि आया यांनाही कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झालेला झालेला असून कस्तुरबा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व संवर्गातील चतुर्थश्रेणी कामगारांसहित परिचारिका याचं म्हणणं आहे की, आम्ही रुग्णांची सेवा करण्यास तयार आहोत. परंतु आमच्या सुरक्षेची हमी रुग्णालय प्रशासनाने घेण्यास तयार नाही, रुग्णालय प्रशासन आम्हाला सुरक्षेच्या दृष्टीने PPP किट, N-95 मास्क, ग्लोज देत नाही.

 चतुर्थश्रेणी कामगार विनवणी करीत आहेत, आम्हाला सुद्धा जगायचे आहे, आम्हालासुद्धा मुलं-बाळं, पती / पत्नी, आई-वडील / सासू-सासरे आहेत, आम्ही रुग्णांची शुश्रुषा करण्यास तयार आहोत. आमच्या २ चतुर्थश्रेणी कामगारांना कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झालेला आहे, आमचं काय होणार अशी सर्व चतुर्थश्रेणी कामगारांमध्ये भीती निर्माण झालेली आहे.

कामगारांना आता अस वाटायला लागलं आहे की, आमच्या जीवाची पर्वा रुग्णालय प्रशासनाला नाही, फक्त काम करा म्हणून आदेश देण्याचं काम याचं आहे, अशी भावना कामगारांमध्ये निर्माण झालेली आहे. कृपया कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झालेल्या कामगारांची नावे देऊ नयेत, हे त्यांच्या कुटुंबीय आणि समाजाच्या दृष्टीने योग्य नाही, आपल्या माहितीसाठी नावे दिलेली आहेत, अशी माहितीही म्युनिसिपल मजदूर  युनियनच्या प्रदीप नारकर यांनी दिली आहे. 

Web Title: Kasturba Hospital Administration's Fourth Grade Worker give Simple Kit, Plain Mask vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.