Join us

Kasaba Bypoll Election Result: मनसेच्या कार्यकर्त्यांनी रविंद्र धंगेकरांना केली मदत; अजितदादांनी सांगितली पडद्यामागची घडामोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 15:51 IST

Kasaba Bypoll Election Result: गेल्या एक महिन्यापासून सुरू असेलल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत.

मुंबई- Kasaba Bypoll Election Result: गेल्या एक महिन्यापासून सुरू असेलल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांनी विजय मिळवला आहे.  यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत धंगेकर यांचे अभिनंदन केले आहे, आणि धंगेकर यांना मनसेनेही मदत केल्याचा दावा केला आहे. 

'मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना जाऊन सांगितले की, आम्ही रविंद्र धंगेकर यांना मदत करणार आहे तुम्हाला जी कारवाई करायची आहे ती करा, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. कुणीही आघाडी केली की जनतेने ठरवले की कुणाच काही चालत नाही, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. 

Kasba Bypoll Result: कसब्यात 'कमळ' कोमेजलं, ३० वर्षांत घडलं नव्हतं ते रवीभाऊंनी 'करून दाखवलं'; भाजपाचा गड काँग्रेसच्या 'हातात'

 अजित पवार काय म्हणाले? 

'निकाल समोर येण्याअगोदर काही बोलण चुकीचे आहे म्हणून बोललो नव्हतो. माझी परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी झाली आहे. आम्ही कसब्यात योग्य उमेदवारी दिली. रविंद्र धंगेकर योग्य उमेदवार ठरला. धंगेकर हे तळागाळात काम करणारा नेता आहे. त्याने महापालिकेतही उत्तम काम केले आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीत एकजुटीने काम केले यामुळे हा विजय झाला, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. 

भाजपाचा गड काँग्रेसच्या 'हातात'

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. कसब्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (ravindra dhangekar) यांचा विजय झाला आहे. त्यांची महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (hemant rasane) यांच्यात थेट लढत होती. तब्बल तीस वर्षानंतर काँग्रेसने कसब्यात पुन्हा मुसंडी मारली आहे. यापूर्वी १९९१ पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळाला होता. रविंद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत.

टॅग्स :अजित पवारमनसेराष्ट्रवादी काँग्रेसराज ठाकरे