करण जोहरची पार्टी ठरली सुपर स्प्रेडर? बॉलिवूडच्या ५० सेलिब्रिटींना कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 07:56 IST2022-06-06T07:55:32+5:302022-06-06T07:56:26+5:30

Karan Johar’s birthday party : पार्टीत सहभागी झालेले शाहरुख खान, अक्षय कुमार, कतरिना कैफ, आदित्य रॉय कपूर, विकी कौशल यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Karan Johar’s birthday party called Covid-19 hotspot after celebs test positive | करण जोहरची पार्टी ठरली सुपर स्प्रेडर? बॉलिवूडच्या ५० सेलिब्रिटींना कोरोना

करण जोहरची पार्टी ठरली सुपर स्प्रेडर? बॉलिवूडच्या ५० सेलिब्रिटींना कोरोना

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा कोरोना हात-पाय पसरू लागला असताना मनोरंजन विश्वातूनही चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे. चित्रपट निर्माता व दिग्दर्शक करण जोहरने ५०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झालेले सुमारे ५० ते ५५ कलावंत कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले आहे. करण जोहर यांच्या कार्यालयाकडून मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

२५ मे रोजी करणने पार्टीचे आयोजन केले होते. करण जोहरच्या काही जवळच्या मित्रांना पार्टीनंतर कोरोना झाला असला तरी त्यांनी ते उघड केले नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. करणच्या पार्टीत सहभागी न झालेला कार्तिक आर्यन कोरोना पॉझिटिव्ह आला. करणच्या पार्टीत सहभागी झालेल्या एका अभिनेत्रीच्या संपर्कात आल्याने कार्तिकला कोरोना झाल्याचे समजते. कार्तिक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिच्यासोबत होता.

शाहरुख, अक्षय कुमार, कतरिना कैफ, विकी कौशल पॉझिटिव्ह!
पार्टीत सहभागी झालेले शाहरुख खान, अक्षय कुमार, कतरिना कैफ, आदित्य रॉय कपूर, विकी कौशल यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

पार्टीमध्ये कोण-कोण? 
सलमान खान, आमिर खान, सैफ अली खान, करीना कपूर, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, मलाईका अरोरा, तब्बू, ट्विंकल खन्ना, सोनाली बेंद्रे, माधुरी दीक्षित, रवीना टंडन, जुही चावला यासह अनेक कलाकार करणच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाले होते.

Web Title: Karan Johar’s birthday party called Covid-19 hotspot after celebs test positive