'भविष्यातील संगीतकार', करण जोहरनं शेअर केला 'तैमुर-यश'चा पियानो वाजवतानाचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 15:58 IST2018-02-12T15:55:12+5:302018-02-12T15:58:10+5:30
बॉलिवूडमधील दिग्दर्शक-निर्माता करण जोहरनं मुलगा यश आणि छोटे नवाब सैफ अली खानचा मुलगा तैमुर यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'भविष्यातील संगीतकार', करण जोहरनं शेअर केला 'तैमुर-यश'चा पियानो वाजवतानाचा फोटो
मुंबई - बॉलिवूडमधील दिग्दर्शक-निर्माता करण जोहरनं मुलगा यश आणि छोटे नवाब सैफ अली खानचा मुलगा तैमुर यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये यश आणि तैमुर पियानो वाजवत असताना दिसत आहेत. यश-तैमुरच्या फोटोला करणनं एका छानसं कॅप्शनही दिलं आहे. करण जोहरनं यश आणि तैमुरला 'भविष्यातील संगीतकार' असे म्हटले आहे. यश आणि रुही यांच्या पहिल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान या फोटो कॅमे-यात कैद करण्यात आला आहे.
यश-रुहीच्या वाढदिवसासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करणनं निमंत्रित केले होते. यानिमित्तानं बॉलिवूड कलाकार आपापल्या मुलांसोबत या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. करीना कपूरचा मुलगा तैमुरपासून ते राणी मुखर्जीची मुलगी अदीरापर्यंत इंडस्ट्रीतील कित्येक स्टार किड्स या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. या दरम्यान, बच्चे कंपनींनी खूप धम्माल केल्याचा फोटोही करण जोहरनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
करण जोहरनं यापूर्वीही आपल्या गोंडस जुळ्या मुलांसोबत तैमुरचा शानदार फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला आहे आणि या फोटोंमध्ये तैमुरदेखील यश आणि जुहीला कंपनी देत मज्जा-मस्ती करताना दिसत आहे.