मुंबई पोलिसांसमोर अखेर कंगना रनौत झाली हजर; दीड तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 05:36 IST2021-12-24T05:35:10+5:302021-12-24T05:36:12+5:30

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खार पोलिसांनी जवळपास दीड तास कंगना रनौतची चौकशी केली.

kangana ranaut finally appeared before Mumbai Police | मुंबई पोलिसांसमोर अखेर कंगना रनौत झाली हजर; दीड तास चौकशी

मुंबई पोलिसांसमोर अखेर कंगना रनौत झाली हजर; दीड तास चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकऱ्यांची तुलना खलिस्तानी चळवळीशी करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ही अखेर गुरुवारी खार पोलिसांसमोर हजर झाली. शीख समुदायाच्या भावना दुखावल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच प्रकरणी चौकशीसाठी तिला बोलावण्यात आले होते. 

गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कंगना तिच्या कारने पोलीस ठाण्यात आली. कारमधून उतरताच तिला तिचे अंगरक्षक आणि पोलिसांनी घेरले. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि तिचा जबाब नोंदविण्यात आला. तिने जबाबात काय सांगितले, याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खार पोलिसांनी जवळपास दीड तास तिची चौकशी केली.
 

Web Title: kangana ranaut finally appeared before Mumbai Police