Jitendra Awhad: संत तुकारामांची शिकवण सांगत आव्हाडांचे राज ठाकरेंना 'जशास तसे' प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 08:57 AM2022-04-13T08:57:54+5:302022-04-13T11:54:43+5:30

ज्या मुंब्र्यात अतिरेकी सापडलेत त्याच मतदारसंघातून आव्हाड निवडून येतात, असे सांगत थेट मुंब्र्यातील गुन्हेगारी, अतिरेकी कारवाईंची आकडेवारीच दिली.

Jitendra Awhad: Replying to the teachings of Saint Tukaram, Awhad's reply to Raj Thackeray 'Jashat Tase' | Jitendra Awhad: संत तुकारामांची शिकवण सांगत आव्हाडांचे राज ठाकरेंना 'जशास तसे' प्रत्युत्तर

Jitendra Awhad: संत तुकारामांची शिकवण सांगत आव्हाडांचे राज ठाकरेंना 'जशास तसे' प्रत्युत्तर

googlenewsNext

मुंबई - राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणावर राजकीय वर्तुळातून येणाऱ्या प्रतिक्रिया थांबत नाहीत, तोच ठाण्यात पुन्हा एकदा राज ठाकरे यांची तोफ धडाडल्याचे पाहायला मिळाले. पाडवा मेळाव्यानंतर महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांनी केलेल्या टीकेचा समाचार राज यांनी आपल्या उत्तरसभेत घेतला. शरद पवार यांच्यापासून ते संजय राऊतांपर्यंत अनेकांवर राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. यातच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या चेहऱ्याला नागाची उपमा दिली. आता, आव्हाड यांनी राज ठाकरेंना जशास तसे उत्तर दिलंय. 

ज्या मुंब्र्यात अतिरेकी सापडलेत त्याच मतदारसंघातून आव्हाड निवडून येतात, असे सांगत थेट मुंब्र्यातील गुन्हेगारी, अतिरेकी कारवाईंची आकडेवारीच दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधत असताना राज ठाकरे यांनी आपला मोर्चा जितेंद्र आव्हाडांकडे वळवला. यावेळी, आव्हाडांचं तोंड नागासारखं असल्याचं सांगत नक्कल केली. त्यानंतर, उद्या काहीतरी बोलेल मी डसतो, वगैरे वगैरे... पण आधीच सांगतो, आला की गरागरा फिरवून फेकून देईल, असे म्हणत आव्हाड यांच्यावर राज ठाकरेंनी टीका केली होती. आता, आव्हाड यांनीही राज ठाकरेंना पाळीव प्राण्याची उपमा दिली आहे. 

खरंतर इतक्या खालच्या पातळीवर मला उतरायचं नव्हतं. शब्दांची कोटी आम्हांलाही करता येते, टिंगल टवाळी आम्हांलाही करता येते. पण, इतक्या खालच्या पातळीवर खरंतर उतरायचंच नसतं. आपण उतरू शकता तर आम्ही पण उतरू शकतो, असे आव्हाड यांनी म्हटलं. ''माझा चेहरा नागासारखा तर तुमचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा आहे'', असे म्हणत आव्हाड यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

तसेच, देशाच्या चित्रपट सृष्टीला जे जॉनी लिवर देऊ शकला ते कोणीच नंतर देऊ शकलं नाही. आज महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर एक नवीन जॉनी लिवर जन्माला आला आहे. या नवीन जॉनी लिवरला खूप खूप शुभेच्छा!
जश्यास तसे हि संत तुकारामाची शिकवण... असे म्हणत आव्हाड यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. 
 
आव्हाडांच्या बुद्धीची कीव येते - राज

राज ठाकरेंनी म्हणे सांगितल्याप्रमाणे कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला, तरी मी संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. इकडून-तिकडून तुला वस्तरा दिसला? यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी केली. 

अतिरेकी सापडलेत त्याच मतदारसंघातून आव्हाड निवडून येतात

२४ ऑगस्ट २००१ सीमीच्या ६ हस्तकांना अटक, २० डिसेंबर २००१ अबु हमजा, १६ मार्च २०२० हिजबुल मुजाहिद्दीनच्या ४ अतिरेक्यांना अटक, २३ जानेवारी २००४ एक दहशतवादी जेरबंद, २०१६ ला ताब्यात घेतलाल आयसीसचा मोरक्या, १६ मे २००३ मुलुंड बॉम्बस्फोटप्रकरणी एकाला अटक, रिजवान मोबिन या संशयित अतिरेक्याला अटक, २६ जानेवारी २०१९ एका दहशतवाद्याला अटक, अशी दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईची यादीच देत अतिरेकी सापडलेत त्याच मतदारसंघातून आव्हाड निवडून येतात, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला. 

देशावर खरेच प्रेम करणारा मुसलमान भरडला जातोय

आता तुम्ही म्हणाल, वस्तरा नाही सापडला. आता कसा संन्यास घेणार? मी कुठे म्हटलो होतो की अतिरेकी सापडणार नाहीत? या अशा असंख्य घटना देशातल्या अनेक मदरशांमध्ये चाललेल्या आहेत. पाकिस्तानी अतिरेकी, शस्त्र सापडत आहेत. यात देशावर खरंच प्रेम करणारा मुसलमान भरडला जात आहे. सलीम मामा शेख याच्या मतदारसंघात ९५ टक्के हिंदू लोक राहतात. पण सलीम निवडून येतात. याचे कारण हे मराठी मुसलमान, देशावर प्रेम करणारे, प्रामाणिक राहणारे मुसलमान. देशात धर्माचा अतिरेक करणारे जे लोक आहेत, त्यांच्यामुळे हे मुसलमान भरडले जात आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. 
 

Web Title: Jitendra Awhad: Replying to the teachings of Saint Tukaram, Awhad's reply to Raj Thackeray 'Jashat Tase'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.