Join us
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 'या' कामासाठी केलं कौतुक; CM एकनाथ शिंदेंना लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 13:49 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झोपडपट्टी धारकांसाठी मोठा निर्णय घेतला.

मुंबई- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झोपडपट्टी धारकांसाठी मोठा निर्णय घेतला. मुंबईतील झोपडपट्टीधारकांना केवळ अडीच लाखांमध्ये घर देण्याचा निर्णय घेतलाय. पुनर्वसन सदनिकेच्या घरांची किंमत ही आता अडीच लाख निश्चित करण्यात आलाय. यासंदर्भातील शासन आदेशही काढण्यात आलाय. या निर्णयावरुन आता देवेंद्र फडणवीस यांच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले, देवेंद्र  फडणवीस यांचे मी अभिनंदन करतो, हा जो निर्णय आहे तो चांगला आहे. पण गोरगरिबांना न्याय देणारा आहे का ? आम्ही एक निर्णय घेतला होता की एल. वाय मिळाल्यानंतर अडीज वर्षांनी त्यांना ते घर विकता आले पाहिजे, तो निर्णय त्यांनी घ्यावा. कारण झोपडपट्टीला एल. वाय दिल्यानंतर कधी विकसित होईल याचे काही वय वर्ष नसतं त्यामुळे गरीब माणसाला झोपडी ही आजारात कामी येते, लग्नात कामी येते, झोपडी हे त्याचं धन आहे, जर एल.वाय दिला आणि तिथे बिल्डिंग बनायला जर तीस वर्षे लागत असतील तर त्याची तीस वर्षे वाया जातात. त्यामुळे देवेंद्रजींना माझी विनंती आहे की त्यांनी हा निर्णय घ्यावा, असंही आव्हाड म्हणाले.

"शिंदे गटातील खासदारांना मिळतेय सापत्न वागणूक"; भाजपा-शिवसेनेत वादाची ठिणगी?

'नालेसफाई आणि कचरा ठाणे महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांचे खाण्याच पुरण आहे. ते कचराही खातात आणि नाल्यातून पैसेही खातात,हे टेंडर साधारण मार्च एप्रिलमध्ये निघायला हवे आणि मे च्या एक तारखेला काम सुरू झाले पाहिजे, पण हे वाट बघत असतात की पाऊस कधी येईल. दरवर्षी ठाण्यात ठिक ठिकाणी पाणी साचत आणि दुर्घटना घडत असतात. यातून ठाणेकरांची सुटका झालेलीच नाही आहे. आयुक्तांनी काय काम करावे, जर हे हेच सांगत असतील तर काय अपेक्षा करणार. मुंब्रा कळव्यातील नाल्यांचा तळ कुठल्याही अधिकाऱ्याने आजपर्यंत बघितला असेल तर त्यांनी मला येऊन सांगावे नालेसफाई हा निव्वळ पैसे खाण्याचा धंदा आहे, असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला.  

 'अनंत करमुसे मारहाण चार्शीट प्रकरण मुख्य न्यायालयाने नाकारले. मग तो माणूस सर्वोच्च न्यायालयात गेला, सर्वोच्च न्यायालयात त्याचे वकील कोण कोण होते यांची यादी काढा मग तुम्हाला समजेल हा पैसा कुठून आला. जो अधिकारी चौकशी करत होता त्या अधिकाऱ्याची पोस्टिंग कुठे कुठे होते ते बघा, म्हणजे एका राजकीय पक्षाच्या ताटाखालचं मांजर असलेला अधिकारी चौकशी करत होता.

आत्तापर्यंत ४ चार्शीट झाल्या तीन चारशीट झाल्या, त्याने अनेक वेळा अनेक कागदपत्रे दिली, आश्चर्याची गोष्ट म्हणजे काल एक मेडिकल सर्टिफिकेट बघितले ते आता अचानक आले. २० मधले मेडिकल सर्टिफिकेट आता अचानक समोर आले. मग एवढ्या दिवस कुठे होत हे मेडिकल सर्टिफिकेट, उच्च न्यायालयात ते का नाही दाखवले, त्यांनी ते कुठेच दाखवले नाही. पण आमचे जे ताटाखालचे मांजर आहेत त्यांनी ते लावलंय, म्हणून अशा केसेसला फार महत्त्व द्यायचे नसते. त्यामुळे मुख्यमंत्री पण कामाला लागतात. मुख्यमंत्र्यांना मला संपवण्यासाठी इतकी करामती करावी लागत आहेत, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी काँग्रेसदेवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदे