जागतिक महिला दिनी जयंत पाटील करणार महिलांच्या कार्याचा गौरव, फेसबुकद्वारे महिलांशी साधणार संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 12:39 PM2020-03-08T12:39:34+5:302020-03-08T12:40:44+5:30

फेसबुक लाईव्हमध्ये जयंत पाटील यांच्यासह इस्लामपूरच्या रेडिओ जॉकी शीतल साळुंखे ही उपस्थित राहणार आहे.

Jayant Patil will be honoring the women on the occasion of World Women Day BKP | जागतिक महिला दिनी जयंत पाटील करणार महिलांच्या कार्याचा गौरव, फेसबुकद्वारे महिलांशी साधणार संवाद

जागतिक महिला दिनी जयंत पाटील करणार महिलांच्या कार्याचा गौरव, फेसबुकद्वारे महिलांशी साधणार संवाद

Next

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील उद्या जागतिक महिला दिनी दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत फेसबुकद्वारे महिलांशी संवाद साधणार आहे. या फेसबुक लाईव्हद्वारे जयंत पाटील राज्यभरातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करणार आहे.

या फेसबुक लाईव्हची विशेष बाब म्हणजे. या फेसबुक लाईव्हमध्ये जयंत पाटील यांच्यासह इस्लामपूरच्या रेडिओ जॉकी शीतल साळुंखे ही उपस्थित राहणार आहे. शीतल साळुंखे या दृष्टीहीन असून आपल्या कलेच्या माध्यमातून नागरिकांना नेत्रदान करण्याचे आवाहन करतात. शीतल यांनी आतापर्यंत अनेकांना नेत्रदान करण्यासाठी प्रेरीत केले आहे. 

तुम्हीही समाजोपयोगी काम करत असाल, तुम्हीही काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असाल तर या फेसबुक लाईव्हमध्ये आपणही सहभागी होऊ शकता असे आवाहन जयंत पाटील यांनी महिलांना केले आहे. 

Web Title: Jayant Patil will be honoring the women on the occasion of World Women Day BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.